Diwali Abhyang Snan 2019 Shubh Muhurat: नरक चतुर्दशीच्या दिवशी ‘हा’ आहे अभ्यंग स्नानाचा मुहूर्त, जाणून घ्या कसे करावे अभ्यंग स्नान
Abhyanga snan | Photo Credits: Instagram

Diwali Abhyang Snan 2019 Shubh Muhurat: महाराष्ट्रासह देशभरात दिवाळीचा सण उत्साहात साजरा केला जातो. भारतात नरक चतुर्दशी दिवशी पहाटे सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंग स्नान करण्याची प्रथा आहे. अभ्यंग स्नानाचे आपल्या शरीराला इतरही आरोग्यदायी फायदे आहेत. यंदा नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नानाचा मुहूर्त नेमकी कोणता आहे? आणि या दिवशी अभ्यंग स्नान नेमकी कसं करावं? याविषयी माहिती जाणून घेऊयात ‘लेटेस्ट ली’च्या या खास लेखामधून...

हेही वाचा - दिवाळी मध्ये केवळ नरक चतुर्दशी दिवशी नव्हे तर नियमित अभ्यंग स्नान करण्याचे आहेत '7' आरोग्यदायी फायदे!

यंदा नरक चतुर्दशी 27 ऑक्टोबर दिवशी आहे. दिवाळीमध्ये नरक यातना, दोषांपासून सुटका मिळवण्यासाठी अभ्यंग स्नान केले जाते. यासाठी पहाटे उठून घरातील सारी पुरूष मंडळी पाटावर बसतात. त्यांचं औक्षण करून स्त्रिया, पत्नी, आई त्यांचा तेलाने मसाज करतात. त्यानंतर उटणं लावलं जातं. पण ही पद्धत केवळ सणापुरती मर्यादीत न ठेवता नियमित करणंही आरोग्याला फायदेशीर आहे.

अभ्यंग स्नानाचा मुहूर्त –

यंदा नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे 5.30 वाजता अभ्यंग स्नानाचा मुहूर्त आहे. या मुहूर्तावर स्नान करणं शुभ मानलं जातं. यासाठी तुम्हाला नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठाले लागेल.

हेही वाचा - Diwali Mehndi Designs: दिवाळी निमित्त झटपट मेहंदी काढण्यासाठी 'या' सोप्या पद्धती ठरतील फायदेशीर (Watch Video)

असं करा अभ्यंग स्नान –

  • आपल्या संपूर्ण शरीराची तिळाच्या तेलाने मालिश करा.
  • तिळाच्या तेलाने मालिश केल्यानंतर व अभ्यंग स्नान करण्यापूर्वी 30 मिनिटे थांबावे. यामुळे तेल आपल्या शरीरात संपूर्ण जिरून जाईल.
  • अभ्यंग स्नान करताना आपल्या संपूर्ण शरीरावर उटणे लावून चांगल्याप्रकारे चोळून घ्या.
  • उटणे वाळल्यानंतर पाण्याच्या सहाय्याने ते काढून घ्या.
  • उटणं वाळल्यानंतर तुम्हा हवं असल्यास साबणाचा वापर करू शकता.
  • साबण लावल्याने तुमच्या शरीरावरील तेलकटपणा निघून जाईल.

दिवाळीमध्ये उटण्याचे महत्व खूप जास्त आहे. उटण्याने आपली शरीराची कांती उजळते. तसेच त्वचा मुलायम देखील राहते. आपला चेहरा स्वच्छ होतो, अंगाला चांगला सुगंध येतो आणि शरीराची मृत त्वचा निघून जाण्यास मदत होते. (सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)