महाराष्ट्रासह देशभरात वसूबारस पासून भाऊबीजेपर्यंत दिवाळीचा सण साजरा केला जातो. यापैकी नरक चतुर्दशी दिवशी पहाटे सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंग स्नान करण्याची प्रथा आहे. दिवाळीच्या दिवसात गुलाबी थंडीत सकाळी उठून गुलाब पाणी किंवा नारळ्याच्या दूधात उटणं मिसळून अभ्यंग स्नान करणं ही केवळ एक दिवसाची प्रथा नाही. दिवाळी प्रमाणेच इतर दिवशी देखील तेलाने मालिश करून अंगाला उटणं लावून अनेक समस्यांना दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. मग जाणून घ्या दिवाळीची केवळ प्रथा म्हणून नव्हे तर नियमित अभ्यंग स्नान करण्याचे नेमके आरोग्यदायी फायदे कोणते?
अभ्यंग स्नानाचे आरोग्यदायी फायदे
- हिवाळ्याच्या दिवसामध्ये वातावरणामध्ये रूक्षता वाढते, अशावेळेस तीळाच्या किंवा खोबरेल तेलामुळे मसाज केल्याने त्वचेचा पोत सुधारतो.
- तेलाचा मसाज नियमित केल्याने रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते.
- अभ्यंग स्नानामुळे सांधे विकाराचे दुखणे कमी होण्यास मदत होते.
- अभ्यंग स्नानामध्ये उटण्याचादेखील वापर केला जातो. उटणं हे नैसर्गिक स्क्रबर असल्याने त्वचेवरील रंध्रं मोकळी होण्यास मदत होतात. त्वचेवर असणार्या डेड स्क्रिनचा स्तर काढून टाकण्यास मदत होते.
- अनेक त्वचाविकारांमध्येही उटणं फायदेशीर आहे. ब्रेकआऊट्स, मुरूमं, ब्लॅक हेड्स यांचा त्रास कमी करण्यासाठी उटणं हा उत्तम नैसगिक उपाय आहे.
- शारिरीक फायद्यांसोबतच मानसिकरित्या शांती मिळवण्यसाठीदेखील उटणं आणि अभ्यंग स्नान फायदेशीर आहे.
- चेहर्यावरील लव/ अनावश्यक केसांपासून नैसर्गिकरित्या सुटका मिळवण्यासाठी
नियमित उटण्याचा वापर करणं हितावह आहे.
यंदा नरक चतुर्दशी 27 ऑक्टोबर दिवशी आहे. दिवाळीमध्ये नरक यातना, दोषांपासून सुटका मिळवण्यासाठी अभ्यंग स्नान केले जाते. यासाठी पहाटे उठून घरातील सारी पुरूष मंडळी पाटावर बसतात. त्यांचं औक्षण करून स्त्रिया, पत्नी, आई त्यांचा तेलाने मसाज करते. त्यानंतर उटणं लावलं जातं. पण ही पद्धत केवळ सणापुरती मर्यादीत नसून नियमित वापर करणं देखील आरोग्याला फायदेशीर आहे.
(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)