Home Cleaning (Photo Credits; Unsplash)

नवरात्र झाली, दसरा झाला आता लवकरच दिवाळीचा सण येतोय. दिवाळी (Diwali) म्हटलं की मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वांमध्ये विशेष उत्साह दिसतो. दिवाळीत शॉपिंगसह फराळ, फटाके, पंचपक्वान्नांचा छान बेत रंगतो. पण त्या सर्वाआधी महत्त्वाची गोष्ट करायची असते जी खूपच त्रासदायक आणि लोकांच्या नाकीनऊ आणते ती म्हणजे दिवाळीची साफसफाई.... दिवाळीत घराची साफसफाई (Home Cleaning) म्हटलं घरातील तरुण मंडळी कंटाळा करतात. मात्र साफसफाई झाल्याशिवाय आई फराळाला सुरुवात करणार नाही ही गोष्टही त्यांच्या एव्हाना लक्षात आल्यामुळे ते देखील मोठ्यांसोबत दिवाळीच्या साफसफाईला लागतात.

यंदाही दरवर्षी प्रमाणे दिवाळीची साफसफाई केली जाईल. तसे दरवर्षीच आपण साफसफाई दरम्यान आपण योग्य ती काळजी घेतो. मात्र यावेळी थोडी जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. कारण तुमच्या घराबाहेर असलेल्या कोरोना व्हायरसचे संकट अजून पूर्णपणे टळले नाही. त्यामुळे तुमची साफसफाई दरम्यान थोडीशी कुचराई देखील तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते. त्यामुळे दिवाळीच्या साफसफाई करताना काही ठराविक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

हेदेखील वाचा- Diwali 2018: दिवाळीत नरकचतुर्दशी दिवशी अभ्यंगस्नान का केले जाते?

दिवाळीच्या साफसफाई साठी महत्त्वाच्या टिप्स:

1. शक्यतो हातात ग्लव्ज घालून सर्व साफसफाई करा. अन्यथा हात वारंवार धुवत राहा. घराच्या सफाईदरम्यान तुमचे हात तुमच्या चेह-यावर, डोळ्यावर नेऊ नका. धूळ शरीरात जाण्याची शक्यता असते.

2. घरात कोप-यातील आलेली जळमटे हाताने काढण्याचा प्रयत्न करु नका. झाडूचा वापर करा. शक्यतो घरात साफसफाईसाठी व्हॅक्युम क्लिनर सारखी आधुनिक उपकरणे असतील तर उत्तम.

3. खिडकीचे ग्रील्स, काचा, आणि ग्रील्सच्या खाचेतील धूळ नीट साफ करा. त्यात कचा जास्त अडकतो. साफसफाईपूर्वी पडदे, सोफा कव्हर, बेड कव्हर काढले तरी चालेल. अथवा पूर्ण साफसफाई झाल्यावर ती सर्व न विसरता काढून धुवायला टाकावीत.

4. महिलांना तसेच पुरुषांना कंबरदुखी, पाढदुखीचा त्रास असेल जास्त उंचावर वा टेबलावर चढून साफसफाई करणे टाळावे. त्यासाठी झाडू मोठ्या काठीला बांधून उंच ठिकाणची साफसफाई करावी.

5. घरातील स्टोरेज सामानातील अनावश्यक वस्तू काढून कच-यात टाका. त्यावर झुरळं वाढतात. कपाट नीट स्वच्छ करुन कपडे नीट व्यवस्थित घडी करुन वा हँगरला लावा. डांबरगोळ्या ठेवा. जेणेकरुन कपाटात किटक येणार नाही.

6. चपलांचे छोटे कपाट देखील नीट स्वच्छ करा. चपला धुवून घ्या.

7. स्वयंपाक घरातील भांड्याची ट्रॉली अथवा स्ँटड नीट स्वच्छ करा.

8. घराच्या संपूर्ण साफसफाईत पूर्ण चेह-यासह डोक्याला रुमाल वा ओढणी बांधा. ज्यामुळे धुळीचा त्रास होणार नाही.

9. बाथरूम, टॉयलेटच्या टाईल्स, स्वच्छ धुवून घ्या. निर्जंतुकीचे औषध टाकून, ब्लिचिंग पाडर टाकून स्वच्छ धुवून घ्या.

10. सोफा, बेडची चे कोने नीट स्वच्छ करा. त्यात ढेकूवन होण्याची शक्यता असतो.

11. हॉलमधील झुमरं, पंखे स्वच्छ करा.

12. फ्रिज, ओवन, मिक्स यांसारखी अन्य विद्युत उपकरणे नीट स्वच्छ करा. आणि मेन स्विच बंद करुन ही साफसफाई करा. विशेष काळजी घ्या.

सर्वात शेवटी आणि महत्त्वाचे साफसफाई झाल्यानंतर फरशी स्वच्छ पाण्याने निर्जंतुकीकरण लिक्विड टाकून स्वच्छ धुवून घ्या. आणि सर्व साफसफाई झाल्यानंतर गरम पाण्याने स्वच्छ आंघोळ करा. अशा पद्धतीने घरात नियोजनबद्ध साफसफाई केल्यास आरोग्यासंबंधीची काही तक्रार उद्भवणार नाही.