Deepotsav (Photo Credits: IANS)

Diwali 2019 Dates:  दिवाळी (Diwali) हा हिंदू धर्मीयांचा मोठा सण आहे. देशभरात विविध प्रकारे हा सण साजरा केला जातो. दिवाळी किंवा दीपोत्सव म्हणून ओळखला जाणारा सण वसूबारस, धनत्रयोदशी (Dhanteras) , नरक चतुर्दशी (Narak Chaturdashi) , दिवाळी पाडवा (Diwali Padwa) आणि भाऊबीज (Bhaubeej) अशा विविध दिवसांनी सजलेला असतो. त्यामुळे या दिवसांमध्ये घराघरात दिव्यांची आरास असते, आकर्षक रोषणाई, कंदील लावून सजावट केली जाते. दारात रांगोळी काढून पाहुण्यांसोबत लक्ष्मीचं स्वागत केलं जातं. या पार्श्वभूमीवर घराघरात साफासफाई करून फराळ बनवण्याची धामधूम ते कपडे, फटाक्यांची खरेदी केली जाते. मग पहा यंदा दिवाळी नेमकी किती दिवस आहे? कोणत्या दिवशी कोणता सण साजरा केला जाणार आहे.

अश्विन कृष्ण द्वादशी पासून यम द्वितीया म्हणजे कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत हा सण साजरा केला जातो. त्यामुळे यंदा 25 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर अशी पाच दिवस दिवाळी साजरी केली जाणार आहे.

दिवाळी 2019 चे वेळापत्रक पहा कसं आहे?

वसूबारस

वसू बारस दिवशी घरातील दूध दुभत्या जनावरांची पूजा केली जाते. यंदा 25 ऑक्टोबर दिवशी गोवत्स द्वादशी म्हणजेच वसू बारस साजरी केली जाईल. Diwali 2019: दिवाळी सणाचा पहिला दिवस आणि वसुबारस साजरी करण्याची खास पद्धत घ्या जाणून.

धनत्रयोदशी

आयुर्वेदाची देवता धन्वंतरी यांचं पूजन, धनाची देवता कुबेर यांची धनत्रयोदशी दिवशी पूजा करण्याची प्रथा आहे. यंदा धनतेरस, धनत्रयोदशी हा सण 25 ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे. धनत्रयोदशी दिवशी कुबेर आणि धन्वंतरी पूजन करण्याचे महत्त्व, पुजा विधी आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या.

नरक चतुर्दशी

दिवाळी अभ्यंस्नान करून दिवाळीची महराष्ट्रात खरी सुरूवात होते तो दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. यंदा 27 ऑक्टोबरला दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे नरक चतुर्दशी आहे.

लक्ष्मी पूजन

लक्ष्मी पूजन करून घरात सुख, सौख्य, मांगल्याच्या प्राप्तीसाठी प्रार्थना केली जाते तो दिवस म्हणजे लक्ष्मी पूजन. यंदा लक्ष्मी पूजनही 27 ऑक्टोबरला आहे. Diwali 2019; जाणून घ्या, दिपावलीला लक्ष्मीपूजन ‘कसे’ आणि ‘कोणत्या’ मुहूर्तावर करावे?

दिवाळी पाडवा

साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त समजला जाणारा दिवाळी पाडवा हा दिवस पती-पत्नींसाठी हा दिवस खास असतो. यंदा दिवाळी पाडवा 28 ऑक्टोबर दिवशी आहे. Diwali Padwa 2019: दिवाळी पाडवा का साजरा केला जातो, जाणून घ्या महत्व.

 भाऊबीज

बहीण भावाचा सण म्हणजे भाऊबीज साजरी करून दिवाळी सणाची सांगता केली जाते. यंदा भाऊबीज 29 ऑक्टोबर दिवशी आहे.

यंदा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या धामधूमीमध्येच दिवाळीचा सण आहे. 24 ऑक्टोबर दिवशी निवडणूक निकालाची मतमोजणी आहे. त्यानंतर दुसर्‍याच दिवसापासून दिवाळीचा सण सुरू होणार आहे.