महाराष्ट्रामध्ये आज (21 ऑक्टोबर) वसूबारस (Vasu Baras) साजरी करत दिवाळीची (Diwali) सुरूवात झाली आहे. दिवाळीच्या दिवसात वसूबारस, त्यानंतर धनतेरस, नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन त्यापाठोपाठ दिवाळी पाडवा आणि भाऊबीज साजरी केली जाते. यंदा दिवाळीच्या दिवसात सूर्यग्रहणही आलं असल्याने अनेकांच्या मनात दिवाळी सेलिब्रेशन बाबत काही प्रश्न आहेत. त्यापैकीच एक दिवस म्हणजे धनतेरस किंवा धनत्रयोदशी सेलिब्रेशन नक्की कधी आहे? हे देखील नक्की वाचा: Happy Diwali 2022 Advance Messages: दिवाळी निमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, SMS, Images च्या माध्यमातून मित्र-परिवारास द्या खास शुभेच्छा!
धनतेरस/ धनत्रयोदशी जाणूनग घ्या नेमकी कधी?
दिवाळीच्या दिवसामध्ये अश्विन कृष्ण त्रयोदशी दिवशी प्रदोषकाळी धनतेरस साजरी करण्याची प्रथा आहे. प्रसिद्ध पंचांगकर्ते दा कृ सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार 22 ऑक्टोबर दिवशी संध्याकाळी 6 वाजून 2 मिनिटांनी द्वादशी संपून त्रयोदशी सुरू होणारआहे. या दिवशी प्रदोषकाळ संध्याकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी सुरू होणार असून रात्री 8 वाजून 37 मिनिटांचा आहे. या काळात म्हणजे प्रदोषकाळात त्रयोदशी आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि कोकणामध्ये 22 ऑक्टोबरला धनत्रयोदशी साजरी केली जाणार आहे. नक्की वाचा: Dhanteras Muhurat Timing: धनतेरस दिवशी सोनं, चांदी सह मौल्यवान वस्तूंच्या खरेदीसह लक्ष्मी मातेच्या पूजनाचा मुहूर्त पहा काय?
महाराष्ट्रात जेथे सूर्यास्ताची वेळ 6 वाजून 3 मिनिटांपूर्वीची आहे तेथे म्हणजे सोलापूर, नागपूर, अकोला, अमरावती, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद या ठिकाणी 23 ऑक्टोबरला धनत्रयोदशी साजरी केली जाणार आहे.
धनत्रयोदशी दिवशी धन्वतरीची पूजा केली जाते. तसेच धन संपत्तीची पूजा करताना माता लक्ष्मी आणि कुबेराची देखील पूजा करून घरात पैशांची बरसात होत रहावी यासाठी प्रार्थना केली जाते.