Happy Diwali 2022 Advance Messages: दिवाळी निमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, SMS, Images च्या माध्यमातून मित्र-परिवारास द्या खास शुभेच्छा!
Happy Diwali 2022 Advance Messages (PC - File Image)

Happy Diwali 2022 Advance Messages: हिंदू कॅलेंडरनुसार, दिवाळी हा सण दरवर्षी कार्तिक महिन्याच्या अमावस्येला साजरा केला जातो. असं म्हणतात की, कार्तिक महिन्याच्या दिवशी भगवान राम 14 वर्षांचा वनवास संपवून रावणाचा वध करून अयोध्येला परतले. या आनंदात शहरातील नागरिकांनी त्यांचे स्वागत केले आणि दिवे लावून आनंद साजरा केला. तेव्हापासून दरवर्षी दिवाळी हा सण या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी लक्ष्मी सोबत गणेशजीची पूजा केली जाते.

यावर्षी कार्तिक महिन्याची अमावस्या 24 आणि 25 अशा दोन्ही दिवशी आहे. मात्र, 25 तारखेला अमावस्या प्रदोषकाळाच्या आधी संपत आहे. अशा परिस्थितीत 24 ऑक्टोबरला अमावस्या वैध असेल आणि 24 ऑक्टोबरला दिवाळीचा सण साजरा केला जाईल. दिवाळी हा हिंदू धर्मातील अतीशय मोठा सण आहे. हा सण सुरू होण्याच्या आधीपासूनचं अनेकजण दिवाळीच्या Advance शुभेच्छा देतात. म्हणून आम्ही तुमच्यासाठी दिवाळीच्या अॅडव्हान्स शुभेच्छा घेऊन आलो आहोत. तुम्ही Wishes, SMS, Images च्या माध्यमातून आपल्या मित्र-परिवारास दिवाळीच्या अॅडव्हान्स शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता.

दिपावलीपासून ते भाऊबीजेपर्यंतच्या,

साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही,

मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या

परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!

Happy Diwali 2022 Advance Messages (PC - File Image)

दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,

सुखाचे किरण येती घरी,

पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा,

आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Diwali in Advance!

Happy Diwali 2022 Advance Messages (PC - File Image)

पुन्हा एक नवे वर्ष,

पुन्हा एक नवी आशा,

तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा

एक नवी दिशा नवे स्वप्न,

Happy Diwali in Advance!

Happy Diwali 2022 Advance Messages (PC - File Image)

स्नेहाचा सुगंध दरवळला,

आनंदाचा सण आला.

विनंती आमची परमेश्वराला,

सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.

Happy Diwali in Advance!

Happy Diwali 2022 Advance Messages (PC - File Image)

आनंदाचे गाणे गात दिवाळी येते अंगणात,

सुखाची मग होते बरसात तेजाची मिळते साथ.

हि दिवाळी आनंदाची, सुखसमृध्दीची जावो.

Happy Diwali in Advance!

Happy Diwali 2022 Advance Messages (PC - File Image)

दिवाळीची आली पहाट, रांगोळ्यांचा केला थाट

अभ्यंगाला मांडले पाट, उटणी, अत्तरे घमघमाट

लाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट

पणत्या दारांत एकशेसाठ, आकाश दिव्यांची झगमगाट!

दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

Happy Diwali 2022 Advance Messages

दिवाळीत लक्ष्मीजींसोबत गणेशाच्या पूजेला खूप महत्त्व आहे. असे मानले जाते की, या दिवशी जे लक्ष्मी गणेशाची मनापासून पूजा करतात त्यांच्यावर माता लक्ष्मीची कृपा कायम राहते.