Yam Deep Daan 2022 Muhurat: धनोत्रयादशीच्या दिवशी का केलं जातं यमदीप दान, जाणून घ्या यमाच्या नावाच्या दीप दानाचे विशेष महत्व
यमदीपदान Photo credit: Pixabay

धनोत्रयादशी (Dhanotrayadashi) हा दिवाळीचा पहिला दिवस. या दिवसापासून दिवाळसणाला सुरुवात होते. धनोत्रयादशीला हिंदु संस्कृतीत (Hindu Tradition) साडेतीन मुहूर्तापैकी एक समजला जाते. कुठल्याही नवीन कामाची सुरुवात किंवा नवीन वस्तु खरेदी करायची असल्यास धनोत्रयादशी हा सर्वोत्तम मुहूर्त आहे. या दिवशी सर्वत्र वातावरण मंगलमय आणि उत्साहाचं असतं. कारण दिवाळीचा पहिला दिवस असल्याने या दिवशी पासून दिव्याची रोषणाई केली जात, अंगणात रांगोळी काढल्या जाते. पण याचं सोबत धनोत्रयादशीच्या दिवशी संध्याकाळी यमदीप दान (Yam Deep Dan) केल्या जातं. यमदीप दान म्हणजे यमराजाला दिप म्हणजे दिवा दाण करणे.

 

पुढील येणाऱ्या वर्षभरात कुटुंबामध्ये अपमृत्यूचं संकट येऊ नये म्हणून धनत्रयोदशीच्या संध्याकाळी (Dhanotrayadashi Evening) यमदेवतेसाठी एक दिवा दान करण्याची पद्धत आहे. घर परिवारातील प्रत्येक व्यक्ती सुखी, सुरक्षित, निरोगी राहो यासाठी यमराजाला दिवा दान केला जातो. आपल्या घरावर यमाची सावली पडू नये यासाठी प्रकाशमय करणारा दिप यमराजाला दान केला जातो. (हे ही वाचा:- Dhanteras Muhurat Timing: धनतेरस दिवशी सोनं, चांदी सह मौल्यवान वस्तूंच्या खरेदीसह लक्ष्मी मातेच्या पूजनाचा मुहूर्त पहा काय?)

 

धनत्रयोदशी तिथी सुरुवात 22 ऑक्टोबरला (October) संध्याकाळी 06 वाजून 02 मिनीटांनी सुरुवात होते.धनत्रयोदशी तिथी समाप्ती  23 ऑक्टोबरला संध्याकाळी 06 वाजून 03 मिनीटांनी समाप्त  होते.  तरी तुम्हाला दिपदान करायचं असल्यास तुम्ही 22 ऑक्टोबरला संध्याकाळी सहानंतर कधीही दिपदान करु शकता. दिर्घकालीन आणि निरोगी आयुष्यासाठी या उपाय अत्यंत फायदेशीर उपाय आहे. धनोत्रयादशीच्या दिवशीच्या दिपदान केल्यास ते यमराजास प्रसन्न करते.