भगवान दत्तात्रेयांना ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांच रुप म्हणजेच भगवान दत्त, असे मानले जाते. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी प्रदोषकाळात भगवान दत्तात्रेयाचा जन्म झाला. तेव्हापासून पुराण काळात आणि पौराणिक कथांमध्ये सांगितल्यानुसार या दिवशी दत्त जयंती (Datta Jayanti 2020) परंपरेने साजरी केली जाते. यंदाही दत्त जयंती (Datta Jayanti 2020) मार्गशीर्ष शु. 14 , पोर्णिमा (29 डिसेंबर) या दिवशी साजरी होत आहे. मार्गशीर्ष (Margashirsha) महिन्यातील पौर्णिमेला दत्त जयंती (Datta Jayanti) भारतासह जगभरातील अनेक ठिकाणी साजरी केली जाते. लोक एकमेकांना शुभेच्छा (Datta Jayanti 2020 HD Images) देतात. आपल्यालाही दत्त जयंती निमित्त शुभेच्छा द्यायच्या असतील तर त्यासाठी HD Wishes खास WhatsApp, Facebook आणि सोशल मीडियात शेअर करण्यासाठी.
दत्तात्रेयामध्ये गुरु आणि देव दोघांचाही निवास असल्याचे सांगितले जाते. म्हणूनच दतात्रेयांना गुरुदेव दत्त असेही संबोधले जाते. तिन तोंडे आणि एक शरीर असा अवतार असलेल्या भगवान दत्त (Lord Datta) यांच्या जयंतीनिमित्त विवध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. (हेही वाचा, Datta Jayanti 2020 Wishes in Marathi: दत्त जयंती निमित्त मराठमोठ्या शुभेच्छा, Wallpapers, Messages, Images, Greetings पाठवून भक्तांना द्या खास शुभेच्छा!)
भगवान दतात्रेयांचे 24 गुरु
भगवान दत्तात्रेयांचे 24 गुरु मानले जातात. त्यांची नावे 1- कबूतर, 2- मधुमक्खी, 3- कुररी पक्षी कुररी पक्षी (पानी के निकट रहने वाले स्लेटी रंग के पक्षी है। 4- भृंगी कीड़ा, 5- पतंगा, 6- भौंरा, 7- रेशम का कीड़ा, 8- मकड़ी, 9- हाथी, 10- हिरण, 11- मछली, 12- सांप, 13- अजगर, 14- बालक 15- पिंगला वेश्या, 16- कुमारी कन्या, 17- तीर बनाने वाला, 18- आकाश-पृथ्वी, 19- जल, 20- सूर्य, 21- वायु, 22- समुद्र, 23- आग, 24- चन्द्रमा अशी आहेत.
दरम्यान, दत्त जयंती कशी साजरी करावी याबाबत ठोस अशी शास्त्रोक्त माहिती किंवा विधी आढळून येत नाही. पण, साजऱ्या होणाऱ्या दत्त जयंती कार्यक्रमांवर नजर टाकता काही गोष्टी ध्यानात येतात. काही लोक, मंडळं, उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करतात. तसा प्रघात पाहायला मिळतो. तर, दत्त मंदिरात भजन, कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. दत्तगुरूंची पूजा, धूप, दीप व आरती करून सुंठवड्याचा प्रसाद वाटप केले जाते.