Datta Jayanti 2020 Wishes in Marathi: दत्त जयंती निमित्त मराठमोळ्या शुभेच्छा, Wallpapers, Messages, Images, Greetings पाठवून भक्तांना द्या खास शुभेच्छा!
Datta Jayanti 2020 Wishes (Photo Credit- File Image)

Datta Jayanti 2020 Wishes in Marathi: मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला. म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो. यंदा 29 जानेवारी रोजी दत्त जयंती साजरी करण्यात येणार आहे. पौराणिक कथेनुसार, पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपांत आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यामुळे देवगणांनी त्या आसुरी शक्‍तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळया रूपांत दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला. त्यानंतर दैत्य नष्ट झाले. तो दिवस 'दत्तजयंती’ म्हणून साजरा करतात.

दत्त जयंतीच्या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केली जाते. दत्तात्रेयांनी दीनदलितांची सेवा, समाजातील दुःख व अज्ञान दूर करण्याचे कार्य केले. त्यांच्या पश्चात श्रीपाद श्रीवल्लभ, श्रीनृसिंह सरस्वती व वासुदेवानंद सरस्वती हे त्यांचे अवतार मानण्यात येतात. महाराष्ट्रात औदुंबर, गाणगापूर, माहूर, नृसिंहवाडी, कुरवपूर, कर्दळीवन या ठिकाणी दत्ताची मोठी मंदिर आहेत. दत्त जयंतीनिमित्त भक्तांना मराठमोठ्या शुभेच्छा, Wallpapers, Messages, Images, Greetings पाठवून शुभेच्छा देण्यासाठी तुम्हाला खालील ईमेजस नक्की उपयोगात येतील. (हेही वाचा - Datta Jayanti 2020: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिरात दत्त जयंती साधेपणाने होणार साजरी; 2 जानेवारी पर्यंत भाविकांना प्रवेशबंदी)

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!!

धावत येसी भक्तांसाठी,

ब्रम्हा, विष्णू, महेश्वरा!!

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!!

दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Datta Jayanti 2020 Wishes (Photo Credit- File Image)

!! दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!!

श्री दत्तगुरू जयंतीच्या आपणांस व

आपल्या सर्व परिवारास मनःपूर्वक

मंगलमय शुभेच्छा!!

॥अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त॥

Datta Jayanti 2020 Wishes (Photo Credit- File Image)

दिगंबरा दिगंबरा

श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।

कृपा करा दयाघना

या जीवावर कृपा करा ॥

दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Datta Jayanti 2020 Wishes (Photo Credit- File Image)

दत्त येऊनिया ऊभा ठाकला ।

भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ॥

प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला ।

जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥

दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Datta Jayanti 2020 Wishes (Photo Credit- File Image)

दत्त दत्त ऐसें लागले ध्यान ।

हरपले मन झाले उन्मन ॥

मी तू पणाची झाली बोलवण ।

एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥

दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Datta Jayanti 2020 Wishes (Photo Credit- File Image)

दरम्यान, दत्त जयंतीपूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. यालाच गुरुचरित्रसप्ताह असेही म्हणतात. दत्त जयंतीच्या दिवशी दत्तमंदिरामध्ये भजन, कीर्तन आदी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या दिवशी दत्तगुरूंची धूप, दीप व आरती करून पूजा केली जाते. राज्यात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रांत या उत्सवाला विशेष महत्त्व आहे.