महाराष्ट्रात मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती (Datta Jayanti) साजरी केली जाते. त्यानिमित्त राज्यातील दत्त मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी असते. दत्त जयंतीचं औचित्य साधत स्वामी भक्त अक्कलकोट (Akkalkot) येथील मंदिरामध्ये मोठी गर्दी करतात मात्र यंदा कोविड 19च्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिर (Swami Samarth Mandir) 25 डिसेंबर पासून 2 जानेवारी 2021 पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात भाविकांना मंदिरात प्रवेश नसेल असे मंदिर प्रशासनाने सांगितले आहे. Datta Jayanti 2020 Date: दत्त जयंती यंदा 29 डिसेंबर दिवशी; जाणून घ्या तिथी तारीख, वेळ.
यंदा 25 डिसेंबरला नाताळ आणि त्याला जोडून आलेला विकेंड आणि पुढे 29 डिसेंबर दिवशी येणारी दत्त जयंती यामुळे मोठ्या प्रमाणात सुट्टीच्या काळात भाविक बाहेर पडत आहेत. परंतू राज्यात अद्यापही कोविड 19 चा धोका कायम असल्याने सरकारने मंदिरं उघडण्यास परवानगी दिली असली तरीही अक्कलकोट मध्ये मंदिर प्रशासनाने या आठवड्याभरासाठी मंदिर ठेवले आहे.
दत्त जयंती निमित्त फटाक्यांची आतषबाजी करत, पालखी सोहळा काढण्याची प्रथा आहे परंतू यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर हे सारे कार्यक्रम रद्द केले जाणार आहेत. केवळ दत्त जन्मसोहळा पार पडणार असून भाविकांना त्यामध्ये सहभागी केले जाणार नाही असे नमूद करण्यात आले आहे.
अनेक भाविक सध्या बाहेर पडल्याने कोल्हापूर, शिर्डी, जेजुरी येथील देवस्थानं भक्तांनी फुलून गेली आहेत. यामध्ये अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं चित्र आहे. नववर्षातही अनेक भाविक देवदर्शन घेऊन आनंदसोहळा साजरा करतात.