Chandra Grahan 2019: 149 वर्षांनंतर गुरू पौर्णिमा आणि चंद्रग्रहण एकाच दिवशी; पहा चंद्र ग्रहणाचा वेध काळ काय?
Chandra Grahan (Photo Credits: Getty)

Partial Lunar Eclipse 2019  Date and Time:  यंदा गुरूपौर्णिमेच्या (Guru Purnima) दिवशी खंडग्रास चंद्रग्रहण (Partial Lunar Eclipse) आहे. अवकाशामध्ये 16-17 जुलै दिवशी हे चंद्रग्रहण दिसणार आहे. हे चंद्रग्रहण 2019 मधील शेवटचं चंद्रग्रहण (Chandra Grahan) आहे. हे ग्रहण भारतामधून दिसणार असल्याने येथील खगोलप्रेमींसाठी ही मोठी पर्वणी आहे. जेव्हा पृथ्वी ही सूर्य व चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते. जेव्हा चंद्राचा काही भाग पृथ्वीच्या सावलीत येतो त्यावेळी खंडग्रास चंद्रग्रहण स्थिती निर्माण होते.

चंद्र ग्रहणाचा कालावधी काय?

यंदा सुमारे 149 वर्षांनंतर गुरू पौर्णिमा आणि चंद्र ग्रहणाचा हा योग एकत्र जुळून आला आहे. या चंद्रग्रहणाचा कालावधी 16 जुलै म्हणजे आषाढ पौर्णिमेच्या उत्तर रात्री ( बुधवार, 17 जुलैच्या पहाटे)  1.30 वाजल्यापासून  17 जुलैच्या पहाटे 4.30 वाजेपर्यंत आहे. त्यामुळे सुमारे 3 तास खंडग्रास चंद्रग्रहण होणार आहे. वेधारंभ 16 जुलैच्या दुपारी 4 वाजल्यापासुन सुरू होणार आहेत. तर ज्या व्यक्ती भारतामध्ये हे ग्रहण पाळणार आहेत त्यांनी रात्री 8.40 मिनिटांंपासून  ग्रहणाचे वेध पाळावेत असे अभ्यासकांनी सांगितले आहे.भारतासोबतच हे चंद्रग्रहण ऑस्ट्रेलिया, आफ्रीका, आशिया, यूरोप आणि दक्षिण अमेरिका या भागात दिसणार आहे. ग्रहणकाळात गर्भवती स्त्रियांनी कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यावी?

भारतामध्ये पुढील चंद्रग्रहण 26 मे 2021 दिवशी पाहता येणार आहे. ग्रहण ही खगोलीय स्थिती आहे. पण आपल्या समाजात त्याच्याबद्दल समज-गैरसमजच अधिक आहेत. यंदा आषाढ पौर्णिमेला म्हणजेच गुरू पौर्णिमेदिवशी ग्रहण आल्याने अनेकांच्या मनात गुरू पौर्णिमा यंदा कशी साजरी करावी असे प्रश्न आहेत. पौर्णिमा 16 जुलै दिवशी पहाटे 1.50 मिनिटांनी सुरू होईल तर 17 जुलैच्या उत्तररात्री 3. 08 मिनिटांंनी संपणार आहे.