Chandra Grahan 2019: ग्रहणकाळात गर्भवती स्त्रियांनी कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यावी?

भारतीय संस्कृतीत ग्रहण आणि त्यासंबंधित अनेक समज प्रचलित आहेत. सामान्य माणसांसोबत गर्भवती स्त्रिया आणि अर्भक यांना देखील ग्रहणाचा धोका असतो, असे मानले जाते.

सण आणि उत्सव टीम लेटेस्टली|
Chandra Grahan 2019: ग्रहणकाळात गर्भवती स्त्रियांनी कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यावी?
Pregnancy and Partial Lunar Eclipse (Photo Credits: File Photo)

Partial Lunar Eclipse 2019: यंदा खंडग्रास चंद्रग्रहण हे  उद्या म्हणजेच 16 जुलै रोजी आहे. या वर्षातील हे शेवटचं चंद्रग्रहण असून रात्री 1.30 वाजल्यापासून 17 जुलैच्या पहाटे 4.30 वाजेपर्यंत ग्रहणाचा कालावधी असणार आहे. सुमारे 3 तास चालणारे हे चंद्रग्रहण  भारतासोबतच  ऑस्ट्रेलिया, आफ्रीका, आशिया, यूरोप आणि दक्षिण अमेरिका येथूनही दिसणार आहे. (149 वर्षांनंतर गुरू पौर्णिमा आणि चंद्रग्रहण एकाच दिवशी; पहा चंद्रग्रहणाचा वेध काळ काय?)

भारतीय संस्कृतीत ग्रहण आणि त्यासंबंधित अनेक समज प्रचलित आहेत. सामान्य माणसांसोबत गर्भवती स्त्रिया आणि अर्भक यांना देखील ग्रहणाचा धोका असतो, असे मानले जाते. त्यामुळे जन्माला येणाऱ्या बाळाला ग्रहणाचा कोणताही त्रास होऊ नये, म्हणून गर्भवती स्त्रियांना काही नियम पाळण्याचा सल्ला  दिला जातो.

घराबाहेर पडू नका:

ग्रहणकाळात गर्भवती स्त्रियांनी घराबाहेर पडू नये. कारण ग्रहणाच्या वेध काळात चंद्राची किरणे गर्भवती स्त्रियांच्या अंगावर पडणे बाळासाठी धोकादायक मानले जाते. यामुळे ओठ कापणे, विचित्र जन्मखुणा बाळाच्या अंगावर येणे, असे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे ग्रहणकाळात गर्भवती स्त्रियांनी घरातच थांबणे योग्य ठरेल.

ग्रहण पाहू नये:

उघड्या डोळ्यांनी ग्रहण पाहू नये. मात्र हा नियम गर्भवती स्त्रियांनाच नाही तर सर्वांना लागू होतो.

विशिष्ट पदार्थ खाणे टाळा:

आंबवलेले, तिखट आणि तेलकट पदार्थ ग्रहण काळात खाणे टाळा. त्याचबरोबर मांसाहार देखील टाळणे योग्य ठरेल.

ध्यानधारणा आणि मंत्रोच्चार:

ग्रहणकाळात गर्भवती स्त्रियांनी काही काम करु नये, असे मानले जाते. त्यामुळे या काळात ध्यान करणे किंवा एखादे मंत्रपठण करणे फायदेशीर ठरेल.

शरीराची स्वच्छता राखा:

गर्भवती स्त्रियांनी ग्रहणकाळात दोनदा अंघोळ करावी. ग्रहण सुरु होण्यापूर्वी आणि ग्रहण संपल्यानंतर. त्यामुळे ग्रहणकाळातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते.

भारतीय संस्कृतीत ग्रहणासंबंधित विविध समज प्रचलित असले तरी ग्रहणाचे नकारात्मक परिणामांमागे कोणतेही शास्त्रिय कारणं अद्याप समोर आलेले नाही. परंतु, गर्भाच्या काळजीपोटी हे नियम पाळणे अयोग्य ठरणार नाही.

सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारीत आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही. 

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.55 93.08
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.04 92.59
पुणे 106.17 92.68
View all
Currency Price Change
USD 80.2775 0.16