
Bhagat Singh Birth Anniversary: भारताला स्वतंत्र्य मिळवून देण्यासाठी सुरु असलेल्या चळवळीतील महान क्रांतिकारक भगत सिंह (Bhagat Singh) यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत. भारत मातेसाठी हसत हसत फासावर जाणारा हा थोर क्रांतिकार आजही भारतीयांच्या मनात क्रांतिचे स्फुल्लींग चेतवून आजरामर आहे. अशा या महान क्रांतिकारकाची यंदा (28 सप्टेंबर 2019) 112 वी जयंती आहे. भगत सिंह यांच्या आठवणीत आज त्यांचे हे 10 क्रांतिकारी विचार खास आमच्या वाचकांसाठी. भगत सिंह यांचा प्रत्येक विचार देशभावनेचे प्रतिक आहे. आजच्या युवकांना त्यातून प्रेरणा तर मिळतेच. परंतू, बरेच काही शिकायलाही मिळते.
भगत सिंह यांचे 10 विचार
- आयुष्य हे स्वत:च्या हिमतीवर जगायचे असते. दुसऱ्यांच्या खांद्याचा सहारा घेऊन तर अंत्ययात्रा जाते.
- वेडा प्रेमी आणि कवी एकाच मुशीत तयार झालेले असतात आणि देशभक्तांना बहुतेक लोक वेढा बोलतात.
- निखाऱ्याच्या कणापेक्षाही माझ्या रक्ताची गर्मी अधिक आहे. मी एक असा वेढा आहे जो तुरुंगातही स्वतंत्र आहे.
- क्रांती शब्दाची व्याख्या शब्दामध्ये करण्यात अर्थ नाही. जे लोक या शब्दाचा वापर दुरुपयोगासाठी करतात त्यांचे फायदे, बोलणे आणि अर्थ अलग असतात.
- जर क्रांतीचा आवाज ऐकवायचा असेल तर आवाज तो मोठा असायला हवा. जर आम्ही बॉम्ब फेकला तर त्याचा अर्थ कोणाला मारणे हा नाही. आम्ही ब्रिटीश राजवटीवर बॉम्ब फेकला असा आहे.
- समाजात आजही असे लोक आहेत. जे बदलाच्या विचारानेच थरथरायला लागतात. आम्हाला निष्क्रियतेच्या भावनेला क्रांतिकारी भावनेत बदलावे लागेल.
- मी या विचारांवर ठाम आहे की, मी महत्त्वाकांक्षी, जिद्दी आणि जीवनावर प्रेम करण्याच्या भावनेने भारलेला आहे. पण, गरज पडल्यास मी या सर्वांचा त्यागही करु शकतो. हेच मोठे बलीदान आहे.
- व्यक्तिला मारुन, अथवा दाबून ठेऊन तुम्ही त्याचे विचार मारु शकत नाही.
- क्राती मानव जातीचा एक अपिहार्य अधिकार आहे. स्वातंत्र्यता हा एक कधीही न संपणारा जन्मसिद्ध हक्क आहे.
- कडवा टीकाकार आणि स्वतंत्र विचार हे दोन्ही क्रांतिकारी विचारांची लक्षणे आहेत.
(हेही वाचा, Lokmanya Tilak 99th Death Anniversary 2019: कसा होता टिळकांचा पत्रकारिता क्षेत्रातील प्रवास, जाणून घ्या सविस्तर)
भगत सिंह यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 या दिवशी झाला. तर मृत्यू 23 मार्च 1931 रोजी झाला. भगत सिंह हे भारताचे प्रमुख क्रांतिकारक होते. चंद्रशेखर आझाज आणि सुखदेव यांनी मिळून ब्रिटीशांविरोधात क्रांतिकारी लढा दिला. लाहोर येथे साण्डर्स नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याची हत्या आणि त्यानंतर दिल्ली येथील सेंट्रल असेम्बलीत बॉम्बस्फोट प्रकरणी ब्रिटीशांनी त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवला. या आरोपाखालीच त्यांना 23 मार्च 1931 रोजी फाशी देण्यात आली. भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु अशा तिन्ही क्रांतिकारकांना 23 मार्च 2019 रोजी ब्रिटीशांनी फाशी दिले.