Anti Terrorism Day 2020: राजीव गांधी यांची पुण्यतिथी भारतामध्ये आतंकवाद विरोधी दिवस म्हणून का पाळला जातो?
राजीव गांधी (Photo Credits: Getty Images)

भारतामध्ये दरवर्षी 21 मे दिवशी आतंकवाद विरोधी दिवस (Anti Terrorism Day) पाळला जातो. या दिवसाचं औचित्य साधून तरूणांनासह समाजातील सामान्यांना आतंकवादाच्या विरूद्ध राहण्यासाठी शपथ दिली जाते. प्रामुख्याने तरूण वर्गाला आतंकवाद, हिंसा यापासून दूर ठेवत समाजात शांती आणि मानवतेचा संदेश देण्यासाठी जागृक केले जाते. एकता वाढवली जाते. देशातील तरूणांमध्ये देशभक्ती वाढवण्यासाठी त्यांना प्रेरणा दिली जाते. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांचा 21 मे दिवशी 1991 यांची हत्या झाल्याने त्यानंतर भारतामध्ये आतंकवाद विरोधी दिनाला विशेष महत्त्व आहे. राजीव गांधी यांच्याविषयी माहिती नसलेल्या 5 इंटरेस्टिंग गोष्टी.

1991 रोजी लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान चेन्नईजवळ लिट्टेने मानवी बॉम्बचा वापर करत राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली. राजीव गांधी  तामिळनाडू मध्ये श्रीपेरंबदूर मध्ये निवडणूक प्रचाराच्या सभेसाठी गेले  होते. तेथे लिबरेशन टाइगर्स ऑफ तमिल ईलम  (LTTE) या संघटनेची एक सदस्य महिला त्यांच्यासमोर आली. तिच्या शरीरावर स्फोटकं लावण्यात आली होती. तिने राजीव गांधींना भेटून नमस्कार करताच त्याचा स्फोट घडवण्यात आला. यामध्ये 25 जणांचा जीव गेला.  लिट्टेला भारताने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले. त्यानंतर जगातील 32 देशांनीही लिट्टेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले. राजीव गांधींच्या हत्येनंतर वी.पी. सिंह सरकारने 21 मे हा दिवस भारतामध्ये आतंकवाद विरोधी दिन म्हणून घोषित केला.

आतंकवाद, आतंकवादी लोकांच्या अमानवीय गोष्टी यामुळे अनेक निष्पाप लोकांचा जीव जातो. त्यांच्यामध्ये मरणाची भीती निर्माण केली जाते. त्यामुळे या मानवी अधिकारांच्या विरूद्ध असणार्‍या गोष्टींचा निषेध करण्यासाठी आणि पुन्हा प्रेम आणि सदभावनेने लोकांना जिंकण्यासाठी हा आतंकवाद विरोधी दिन पाळला जातो.

सरकारी कार्यालयं, शाळा, कॉलेजमधून भारतीयांना दरवर्षी एक शपथ दिली जाते. त्यामुळे नागरिक दहशतवादापासून लांब राहतील याकरिता शपथबद्ध केले जाते. यंदा भारतामध्ये कोरोना व्हायरसचं संकट असल्याने  मर्यादित स्वरूपात, सुरक्षेची काळजी घेत कार्यालयांमध्येच कर्मचार्‍यांंना शपथ द्यावी असे गृहमंत्रालयाचे आदेश आहे. यंदा सोशल मिडीया आणि डीजिटल माध्यमातून या दिवसाच्या निमित्ताने खास आयोजन करावं असं आवाहन केले आहे.