Rajiv Gandhi Death Anniversary 2019: राजीव गांधी यांच्याविषयी माहिती नसलेल्या 5 इंटरेस्टिंग गोष्टी

राजीव गांधींविषयी माहित नसलेल्या 5 इंटेरेस्टिंग गोष्टी

Rajiv Gandhi Death Anniversary 2019: राजीव गांधी यांच्याविषयी माहिती नसलेल्या 5 इंटरेस्टिंग गोष्टी
राजीव गांधी (फोटो सौजन्य- फेसबुक)

कुशल बुद्धिमत्ता आणि धडाडी नेतृत्वाच्या जोरावर वयाच्या 40 व्या पंतप्रधान बनलेले राजीव गांधी(Rajiv Gandhi) हे भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान होते. सुरुवातीच्या काळात राजकारणापासून अलिप्त राहिलेल्या राजीव गांधींनी संजय गांधींच्या (Sanjay Gandhi) अपघाती निधनानंतर राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी राजकारणाचा संपूर्ण चेहरामोहरा बदलून खूप महत्त्वपुर्ण बदल केले. तसेच पंतप्रधान असताना अनेक धोरणात्मक निर्णय देखील त्यांनी घेतले. अशी या कर्तृत्ववान, धुरंदर नेत्याची आज 28 वी पुण्यतिथी. 21 मे 1991 रोजी लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान चेन्नईजवळ लिट्टेने मानवी बॉम्बचा वापर करत राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज आम्ही तुम्हाला अशा 5 इंटेरेस्टिंग गोष्टी सांगणार आहोत, ज्याच्यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही.

1. राजीव गांधी यांचा यांचा जन्म 20 ऑगस्ट 1944 रोजी मुंबईत झाला. राजीव गांधी यांच नाव त्यांचे आजोबा म्हणजे पंडीत जवारहलाल नेहरु(Pandit Jawaharlal Nehru) यांच्या पत्नीच्या नावावरुन ठेवण्यात आले. पंडीत नेहरुंच्या पत्नीचे नाव कमला नेहरु. कमला म्हणजे लक्ष्मी आणि ‘राजीव’ हे सुद्धा कमळाचे दुसरे नाव. त्यामुळे इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या या पहिल्या मुलाचे नाव ‘राजीव’ ठेवण्यात आले.

2. राजीव गांधी यांना राजकारणात अजिबातच रस नव्हता. तर विज्ञान आणि इंजिनीअरींगकडे त्यांचा कल जास्त होता. शिवाय संगीतामध्ये त्यांना विशेष रुची होती. आधुनिक संगीतासोबतच त्यांना पाश्चिमात्य व हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत आवडायचे. त्यांना फोटोग्राफी करण्याचा आणि रेडिओ ऐकण्याचाही छंद होता.

3. राजीव गांधी फ्लाईंग क्लबचे सदस्य होते. त्यांनी तेथे सिव्हिल एव्हिएशनचे प्रशिक्षणही घेतले. 1970 साली एअर इंडियामध्ये कामाला सुरुवात केलेल्या राजीव गांधींनी 1980 साली राजकारणात प्रवेश केला.

4. राजीव गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसने 542 पैकी 411 जागांवर घसघशीत विजय मिळवला होता. 1984 साली काँग्रेसच्या बाजूने जनतेचा कौल हा आतापर्यंतचा ऐतिहासिक निकाल म्हणून ओळखला जातो.

5. बोफोर्स घोटाळा, भोपाळ दुर्घटनेतील मुख्य आरोपी वॉरेन अँडरसनचं देशाबाहेर पलायन इत्यादी गोष्टींवरुन राजीव गांधी यांच्यावर आरोपही झाले. राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री असणाऱ्या व्ही. पी. सिंग यांनी बोफोर्स प्रकरण बाहेर काढलं. त्यानंतर व्ही. पी. सिंग यांच्यावर कारवाई करण्यात आली. आधी मंत्रिमंडळातून बाहेर, मग काँग्रेसमधूनही त्यांना बाहेर काढण्यात आले.

Mahatma Gandhi Death Anniversary 2019: गांधींजींच्या पुतळ्याला गोळ्या झाडून अखिल भारत हिंदू महासभेने साजरी केली 71 वी महात्मा गांधी पुण्यतिथी, 'नथुराम गोडसे अमर रहे'च्या घोषणा

21 मे 1991 रोजी लिट्टेने मानवी बॉम्बचा वापर करत राजीव गांधींची हत्या केली. त्यांच्या हत्येने संपुर्ण भारतात तीव्र संतापाची लाट उसळली, तर काँग्रेस समर्थकांवर जणू दु:खाचा डोंगरच कोसळला. ह्या घटनेचा जाहीर निषेध करत लिट्टेला भारताने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले. त्यानंतर जगातील 32 देशांनीही लिट्टेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले.

(The above story first appeared on LatestLY on May 21, 2019 08:31 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).