आषाढी एकादशीच्या शुभेच्छा

आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) हा वारकरी संप्रदायासह जगभरातील विठू माऊलींच्या भाविकांसाठीचा मोठा उत्साहाचा दिवस. जगभरात आज (25 जुलै) विठ्ठल-रूक्मिणीचे भक्तगण आषाढी एकादशीचा उत्सव साजरा करत आहेत. आषाढ शुक्ल एकादशी दिवशी आषाढी एकादशी अर्थात देवशयनी एकादशी साजरी केली जाते. यानिमित्ताने सर्वत्र विठ्ठल रूक्मिणीची मंदिरं सजिली आहेत.पंढरपूरात देखील विठ्ठल-रूक्मिणीच्या दर्शनासाठी अनेक भाविक पायी वारी करत पोहचले आहेत. मग विठू माऊलीच्या भक्तांचा हा आषाढी एकादशीचा सोहळ्याचा आनंद अजून द्विगुणित करण्यासाठी तुम्ही त्यांना WhatsApp wishes, Messages, Quotes, HD Images शेअर करून  शुभेच्छा देऊ शकता.

आषाढी वारी ही महाराष्ट्रातील जुनी परंपरा आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीत 'आषाढी एकादशी' या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.या आषाढी एकादशीचे व्रत केल्याने वर्षातील सर्व एकादशींचे पुण्य लाभते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. नक्की वाचा:  Ashadhi Ekadashi Rangoli: आषाढी एकादशी निमित्त विठूमाऊलींच्या रांगोळी साकारत साजरा करा देवशयनी एकादशीचा सण .

आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देणारी मराठमोळी शुभेच्छापत्र

विठ्ठल माझा ध्यास, विठ्ठल माझा श्वास,
विठ्ठल माझा भास, विठ्ठल माझा आभास…
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा

विठू माऊलीच्या भाविकांना आषाढी एकादशीच्या भक्तीमय शुभेच्छा

आषाढी एकादशीच्या शुभेच्छा
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा

 

काया ही पंढरी
आत्मा हा विठ्ठल
नांदतो केवळ पांडुरंग
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा

 

 

आवडे हे रूप गोजिरे सगुण,
पाहतां लोचन सुखावले
आषाढीच्या एकादशीच्या शुभेच्छा

आषाढी एकादशीच्या शुभेच्छा
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा

आषाढी एकादशीच्या मंगलमय पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा!

आषाढी एकादशीच्या शुभेच्छा
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा

आषाढी आणि कार्तिकी एकादशीचं औचित्य साधत राज्याच्या कानाकोपर्‍यातून लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरमध्ये दाखल होतात. वारकर्‍यांच्या दृष्टीने विठ्ठल हा केवळ देव नसून, भक्तासाठी वाट पाहणारा, प्रेमाने उभा असलेला आणि भक्तीला सर्वश्रेष्ठ मानणारा परमेश्वर आहे. त्यामुळे पंढरपूर हे केवळ तीर्थक्षेत्र नसून, भक्ती, समर्पण आणि सेवाभावाचे जिवंत प्रतीक मानले जाते. त्यामुळे लाखो दिंड्या, संतांच्या पालख्या घेऊन कित्येक किलोमीटरचा प्रवास करून आलेले वारकरी विठ्ठल-रूक्मिणीच्या दर्शनाने, चंद्रभागेच्या तीरी स्नान करून आषाढी वारीची सांगता करतात.