Google Doodle On Anne Frank: गुगलने (Google) हटके डूडल (Doodle) बनवत प्रसिद्ध अ‍ॅना फ्रँक (Anne Frank) हिला आदरांजली अर्पण केली आहे. अ‍ॅना फ्रँक हिच्या डायरीच्या प्रकाशनाला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गुगलने खास डूडल (Google Doodle On Anne Frank) बनवले आहे. या डूडलच्या माध्यमातून अ‍ॅना फ्रँक यांना सलाम करण्यात आला आहे. गुगलने डूडलच्या माध्यमातून एक एॅनिमेटेड स्लाईड शोच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली दिली आहे. या स्लाईडशोमध्ये त्यांच्या आयुष्यासी संबंधीत वास्तव घटनांना दर्शविण्यात आले आहे. अ‍ॅना फ्रँक यांच्या डायरीत त्यांनी त्यांच्या आणि मित्रांच्या कुटुंबाद्वारा 2 वर्षे सहन केलेल्या वेदनांबद्दल लिहिले आहे. या डायरीत Anne Frank यांनी डायरीत तेव्हा लिहिले आहे जेव्हा त्या केवळ 13 ते 15 वर्षांच्या होत्या. गूगलने म्हटले आहे की, अ‍ॅना फ्रँक द्वारा लिहिण्या आलेली ही डायरी आजपर्यंत होलोकॉस्ट आणि युद्धाच्या घटनांबद्दल सर्वात मार्मिक आणि व्यापाक रुपात वाचली जाणाऱ्या पुस्तकांपैकी एक आहे.

Anne Frank यांचा जन्म 12 जून 1929 मध्ये झाला. त्यांनी लिहिलेली ही डायरी होलोकॉस्टच्या काळात घडलेल्या घटनांचे वर्णन करते. अॅनाच्या जन्मानंतर काही काळातच त्यांच्या कुटुंबाने फ्रँकफर्ट जर्मनी सोडून एम्स्टर्डम नेदरलँड येथ यावे लागले. तोवर जर्मनीमध्ये त्या वेळेपर्यंत अल्पसंख्याकांबद्दल भेदभावाने अत्युच्च टोक गाठायला सुरुवात केली होती. Anne Frank जेव्हा केवळ 10 वर्षाच्या होत्या तेव्हा दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली होती. युद्धाची सुरुवात झाल्यावर अल्पवधीतच जर्मनीने नेदरलँडवर आक्रमन केले गेले. ज्या युद्धाचा परिणाम अ‍ॅना फ्रँक आणि त्यांच्या कुटुंबर पडला. हिटलरच्या नाजी सरकारच्या काळात नाझींनी ज्यूंना आपली शिकार बनवले. ज्यूंना कैदेत ठेवण्यात आले. त्यांना अत्यंत क्रूररित्या मारहाण आणि जिवे मारण्यात आले. अमानुशपणे छळछावण्या उभारण्यात आल्या. या काळात ज्यूंना आपले घरदार सोडून इतर मिळेल त्या ठिकाणी आश्रय घेण्यात आला. (हेही वाचा, Google Doodle Today India: गूगल डूडल 'पिझ्झाचा उत्सव', तुमच्या आवडत्या Pizza Puzzle Game आणि History of Pizza सोबत)

इतर कुटुंबीयांप्रमाणे अ‍ॅना फ्रँकच्या कुटुंबानेही सर्व काही सोडून आश्रय घेतला. अ‍ॅनाला जव्हा पकडण्यात आले तेव्हा तिच्याकडून चार डायऱ्या आणि काही दिवसांपूर्वीच तिच्या वाढदिवसाला भेटलेल्या काही गोष्टी मिळाल्या. अॅनाने आपल्या 25 महिन्यांच्या प्रत्येक अनुभवाला डायरीत उतरवले होते. आपण मारले जाऊ असे तिला सारखे वाटत होते. त्यामुळे तिने डायरीतही हे युद्ध संपल्यावर आपली डायरी प्रसिद्ध व्हावी असे म्हटले होते. तिने आपले हे लिखान "हेट अचरहुइस" ("द सीक्रेट एनेक्स") नावाने एका कथेत वापरले.

नाझी सरकारच्या शिपायांनी अ‍ॅनाच्या कुटुंबाला 1944 मध्ये पकडले. त्यांना अटक करुन डिटेन्शन सेंटरमध्येही पाठविण्यात आले. तिथे त्यांचा अतोनात छळ झाला. त्यांच्या कुटुंबाला पोलंडलाही पाठविण्यात आले. पुढे तिचा मृत्यू झाला. मृत्यूसमयी तिचे वय केवळ 15 वर्षांचे होते. तिच्या मृत्यूनंतर तिची डायरी प्रसिद्ध झाली. ही डायरी जगभरात 80 पेक्षा अधिक भाषांमध्ये भाषांतरीत करण्यात आली आहे.