Google Doodle Today India: आजचे गूगल डूडल (Google Doodle) नेहमीपेक्षा जरा हटके आहे. अर्थात, गुगलचे (Doodle) प्रत्येक डूडल हे नेहमीच हटके असते. आजचे काहीसे नेहमीपेक्षा उल्लेखनीय. गूगलकडून आज जगभरातील सर्वात लोकप्रीय डिश पिझ्झाला डूडलवर स्थान देण्यात आले आहे. गूगल आज डूडलद्वारे पिझ्झा डे (Pizza) सेलिब्रेट करत आहे. आजच्याच दिवशी (डिसेंबर 6) सन 2007 मध्ये यूनेस्कोच्या प्रतिनिधी सूचीत नीपोलिटन 'पिजाइउलो' बनविण्याच्या प्रक्रियेचा समावेश करण्यात आला होता. यात मानवतेची अमूर्त सांस्कृतीक बनविण्यात आले होते. याच कारणामुले गूगल डूडलमध्ये आज जगप्रसिद्ध पिज्जा डिशचा समावेश करण्यात आला आहे.
आजच्या गूगल डूडलमध्ये जगभरातील 11 लोकप्रिय पिज्झा टॉपिंग समाविष्ट आहेत. हा पिज्जा कोणत्या टाईपचा आहे त्यानुसार युजर्सला पिज्जा कापायचा (Pizza Puzzle Game) आहे. पिझ्झा कापताना आपली स्लाईस जितकी योग्य असेल तेवढे आपल्याला स्टार मिळतील. गुगलच्या एका युजर्सला साधारण 11 प्रकारचे पिज्जा कापायचे आहेत. ज्यात पिझ्झाचे अनेक प्रकार समाविष्ट आहेत. ते खालील प्रमाणे. (हेही वाचा, मुंबई सेंट्रल स्थानकावर फूड वेडिंग मशीन देणार ताजा पिझ्झा, आईस्क्रिम, फ्रुट ज्युस !)
मार्गेरिटा पिझ्झा(पनीर, टमाटर, तुलसी), पेपरोनी पिझ्झा (पनीर, पेपरोनी), व्हाइट पिझ्झा (पनीर, व्हाइट सॉस, मशरूम, ब्रोकोली), कॅलाब्रेसा पिझ्झा (पनीर, कैलाब्रेसा, कांद्याचे तुकडे) होल ब्लैक ऑलिव्स), मुजेरेला पिझ्झा (चीज, ऑरेगैनो, होल ग्रीन ऑलिव्स), हवाईयन पिझ्झा (चीज, हैम, अननस), मॅग्यारोस पिझ्झा (चीज, सलामी, बेकन, कांदा, चिली पेपर), टेरीयाकी मेयोनेज पिझ्झा (चीज, टेरीयाकी) चिकन समुद्री शेवाळ, मेयोनेज), टॉम यम पिझ्झा (पनीर, झींगा, मशरूम, मिरची, लिंबाची पाने), पनीर टिक्का पिझ्झा (पनीर, शिमला मिरची, कांदा, लाल शिमला मिरची), मिठाई पिज्जा
इजिप्त ते रोमपर्यंत प्राचीन परंपरेत प्राचिन काळापासून टॉपिंगसोबत फ्लॅटब्रेट सेवन केले जाते. परंतू, दक्षिणी-पश्चिम शहरांमध्ये व्यापक स्वरुपात पिज्झा 1700 च्या शतकात शेवटच्या दशकात पिज्जा तयार करण्यात आला. ज्यात (टोमॅटो आणि पनिरसोबत आटाही समाविष्ट होता. अलिकडील काळात पिज्जा प्रचंड लोकप्रीय ठरला आहे.