मुंबई सेंट्रल स्थानकावर फूड वेडिंग मशीन देणार ताजा पिझ्झा, आईस्क्रिम, फ्रुट ज्युस !
मुंबई सेंट्रल स्थानकावर फूड वेडिंग मशीन (Photo Credits: IRCTC/Twitter)

काही दिवसांपूर्वीच मुंबईला नेरूळ -उलवे ही चौथी उपनगरीय रेल्वे सेवा मिळाली आहे. आता पश्चिम रेल्वेवर प्रवास करणार्‍यांसाठी रेल्वे प्रशासनाने मुंबई सेंट्रल स्थानकावर नवी सोय केली आहे. आता प्रवाशांना ताजे आणि चमचमीत पदार्थ मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर एका वेंडिंग मशीनच्या द्वारा मिळणार आहेत. नेरुळ- बेलापूर-खारकोपर लोकल वेळापत्रक; उलवेसह नवी मुंबईकरांनाही फायदा

रेल्वे प्रशासनासोबत Bueno Insta Pizza Pvt Ltd (YESS PIZZA) आणि Owl Tech Pvt Ltd (FRSHLY)यांच्या मदतीने खास वेडिंग मशीनची सोय केली आहे. YESS PIZZA द्वारा पिझ्झा, फ्रेंच फ्राईज, पॉपकॉर्न, आईसक्रीम, फ्रुट ज्युस मिळणार आहेत. सुमारे 10.5 इंचाचा पिझ्झा प्रवाशांना 150-300 रूपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. तर फ्रेंच फ्राईज, आईस स्क्रीम आणि पॉपकॉर्नसारखे पदार्थ 100 रूपयांपेक्षा कमी पैशात उपलब्ध होणार आहेत.

FRSHLY द्वारा ताजे पॅक्ड फूड प्रवाशांसाठी उपलब्ध असेल. सहा- आठ तास ताजे रहाणारे पदार्थ यामध्ये असतील. दिवसातून दोन वेळेस पदार्थ बदलले जाणार आहेत. त्यामुळे सुरक्षित आणि ताजं अन्न प्रवशांपर्यंत पोहचवण्यासाठी रोबोटिक मशीन काम करणार आहे. नियमित सकाळी 7 ते रात्री 11 या वेळेत हे वेडिंग मशीन प्रवाशांसाठी खुले राहणार आहे.