नेरुळ- बेलापूर-खारकोपर लोकल वेळापत्रक (प्रतिमा सैजन्य -मध्य रेल्वे)

नेरुळ-उरण प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत आनंदाची बातमी. गेली अनेक काळ रखडलेला नेरुळ-उरण रेल्वे प्रकल्प अखेर मार्गी लागला. इतकेच इतकेच नव्हे तर, या सेवेतील पहिली लोकल आज (सोमवार, १२ नोव्हेंबर) मार्गस्थ होईल. नेरुळ-खारकोपर व खारकोपर-बेलापूर या मार्गावरुन ही लोकल प्रत्येकी १० अप आणि १० डाऊन फेऱ्या करेन. जाणून घ्या या रेल्वे मार्गाचे वेळापत्रक काय असेल ?

मार्ग आणि वेळापत्रक

नेरुळहून खारकोपरकडे सुटणाऱ्या गाडय़ा

सकाळी - ७.४५, ८.४५, १०.१५, ११.४५,

दुपारी - १.१५, २.४५

सायं. - ४.१५, ५,४५, रात्री ७.१५, ८.४५

बेलापूरहून खारकोपरकडे सुटणाऱ्या गाडय़ा

सकाळी- ६.२२, ९.३२, ११.०२

दुपारी- १२.३२, २.०२, ३.३२

सायं.- ५,०२, ६.३२, रात्री ८.०२, ९.३२

खारकोपरहून नेरुळकडे सुटणाऱ्या गाडय़ा

सकाळी - ६.५०, ९.१५, १०.४५

दुपारी -१२.१५, १.४५, ३.१५

सायं -४.४५, ६.१५, ७.४५, ९.१५

खारकोपरहून बेलापूरकडे सुटणाऱ्या गाडय़ा

सकाळी- ८.१५, १०.००, ११.३०

दुपारी- १.००, २.३०, ४.००

सायं. - ५.३०, ७.००, ८.३०, १०.००

(हेही वाचा, १२ नोव्हेंबरपासून बेलापूर-खारकोपर लोकल सेवा होणार सुरु)

नेरुळ- बेलापूर-खारकोपर लोकल वेळापत्रक (प्रतिमा सैजन्य -मध्य रेल्वे)

दरम्यान, या नव्या रेल्वेसेवेचे नागरिक आणि उलवे, नेरुळ खारकोपर परिसरातील नागरिकांनी प्रचंड स्वागत केले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये या परिसरातील नागरिकरण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. सिडकोच्या उन्नती गृहप्रकल्पाअंतर्गत राहायला आलेल्या कुटुंबांचीही संख्या प्रचंड मोठी आहे. त्यामुळे या लोकांना दळणवळणासाठी ही सेवा फायदेशीर ठरणार आहे. यापूर्वी या परिसरातील नागरिकांना रेल्वे उपलब्ध नसल्याने खासगी वाहनाने नेरुळ, जुईनगर तसेच बेलापूपर्यंत जावे लागत होते. प्रवासी सेवेचा अभाव असल्यामुळे स्वत:चे घर असूनही अनेक नागरिक येथे न राहणेच पसंत करत. तसेच, काही लोक नाईलाजाने येथील घरे भाड्याने देत व स्वत: इतर ठिकाणी स्थलांतरीत होत. दरम्यान, आता नव्या रेल्वेसेवेमुळे येथील नागरिकांना नवी मुंबईशी जोडून घेणे सोपे होणार आहे.