Ambedkar Jayanti (Photo Credits-File Image)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar)हे भीम अनुयायींसाठी आदराचं स्थान आहे. दरवर्षी 14 एप्रिलला भीम जयंतीनिमित्त मोठा जल्लोष भारतभर साजरा केला जातो. मात्र यंदा कोरोना व्हायरसचं सावट असल्यानं आता भीम जयंती सामुहिक स्वरूपात साजरी करण्यावर बंधनं आली आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील यंदाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती डिजिटल सवरूपात साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली झाला. त्यानंतर 1928 साली पुण्यामध्ये बाबासाहेबांचा वाढादिवस 'भीम जयंती' म्हणून साजरा करण्याला सुरूवात झाली. या सोहळ्याचे शिल्पकार ठरले ते म्हणजे जनार्दन रणपिसे (Janardan Ranpise)हे सामाजिक कार्यकर्ते. Happy Ambedkar Jayanti 2020 Wishes: भीम जयंतीच्या शुभेच्छा मराठी Messages, WhatsApp Stickers च्या माध्यमातून शेअर करून साजरा करा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस!

पहिली भीम जयंती अशी झाली साजरी!

पहिली भीम जयंती 1928 साली जनार्दन सदाशिव रणपिसे या सामाजिक कार्यकत्याने केली. त्यावेळेस बाबासाहेबांच्या प्रतिमेची रथातून मिरवणूक काढण्यात आली होती. यामुळे समाजात शोषित घटकांना अन्यायाविरूद्ध आवाज उठवण्याची, एकत्र येण्याची, संघटीत होण्याची प्रेरणा मिळाली. हळूहळू भीम जयंतीचा सोहळा गावातून सुरू होऊन शहरात आणि आज परदेशात पोहचला आहे. दबावाखाली राहणार्‍या अनेकांना यामुळे व्यवस्थेविरूद्ध आवाज उठवण्यास माध्यम मिळाले. महार सेवादलाची स्थापना जनार्दन सदाशिव रणपिसे यांनी केली. Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2020 Songs: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त महामानवाला अभिवादन करणारी खास भीमगीतं! 

2017 सालपासून महाराष्ट्रात 14 एप्रिल हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस ‘ज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जातो. 'शिका आणि संघटित व्हा' चा नारा देणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस शिक्षणाचं महत्त्व पटवण्यासाठी आणि ज्ञानाचा हा वसा पुढे घेऊन जाण्यासाठी साजरा करण्याची नवी परंपरा आता भीम अनुयायींमध्ये जोपासण्यास सुरूवात झाली आहे.