Ambedkar Jayanti 2020 Songs: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त महामानवाला अभिवादन करणारी खास भीमगीतं!
Dr. Babasaheb Ambedkar (File Photo)

Ambedkar Jayanti 2020 Marathi Bhimgeet: समाजसुधारक, महान नेते, दलितांचे उद्धारकर्ते अशा विविध रुपात समाजासाठी झटणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 14 एप्रिल रोजी जन्मदिवस. अस्पृश्यांना हीन व अपमानास्पद वागणूक मिळत असतानाच्या काळात 14 एप्रिल 1891 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म महार कुटुंबात झाला. आपल्या बुद्धीमत्तेच्या आणि कर्तबगारीच्या जोरावर अस्पृश्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी त्यांनी पुष्कळ प्रयत्न केले. 'शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा' हा उपदेश त्यांनी दलितांना दिला. दलितांना समाजात समान वागणूक मिळावी म्हणून त्यांनी अभूतपूर्व कार्य केले. त्यामुळेच या महान पुरुषाचा जन्मदिवस 'आंबेडकर जयंती' म्हणून साजरा केला जातो. आंबेडकर जयंती निमित्त सर्वत्र अगदी उत्साहाचे वातावरण असते. तसंच विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र यंदा कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या लॉकडाऊन निमित्त सगळे सोहळे, समारंभ रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे यंदाची आंबेडकर जयंती घरच्या घरी साध्या स्वरुपात साजरी करावी लागणार आहे.

आंबेडकर जयंतीला यंदा साधे स्वरुप आले असले तरी भीमगीतं तुमचा  उत्साह नक्कीच वाढवतील. महामानवाला अभिवादन करणारी अनेक भीमगीते लोकप्रिय आहेत. त्यापैकी काही निवडक भीमगीते खास तुमच्यासाठी...

लोकप्रिय भीमगीते:

आदर्श शिंदे याच्या आवजातील 'माझ्या भीमाची पुण्याई' हे दमदार गाणे.

आनंद आणि आदर्श शिंदे या बापलेकांचे 'जय भीम' हे गाणे.

कडूबाई खरात यांच्या आवाजातील 'आम्ही खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही' हे गाणे.

'भीमा तु इतंक दिलं आम्हा' हे गाणे.

'लिहिलं संविधान' हे आंबेडकरांच्या कार्याचा गौरव करणारे गीत.

14 ऑक्टोबर 1956 साली आंबेडकरांनी आपल्या अनेक अनुयायांसह बौद्धधर्माची दीक्षा घेतली. त्यामुळे ते गौतम बुद्धांचे शिष्य झाले. तर दलितांसाठी आंबेडकरांचे महत्त्व हे कोणत्याही दैवतापेक्षा कमी नाही. आंबेडकरांचे पाळण्यातील नाव 'भीम' आहे. त्यामुळेच आजही त्यांचे अनुनायी 'जय भीम, जय बुद्ध' हा नारा अगदी अभिमानाने देतात.