Akshaya Tritiya 2019: अक्षय्य तृतीया निमित्त पुणे येथील 'दगडूशेठ गणपती' ला 1100 आंब्याची आरास (Watch Video)
Dagdusheth Ganpati (Photo Credits: Facebook)

Dagadusheth Halwai Ganapati Temple Akshaya Tritiya 2019 Decoration:  अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya) आणि मंगळवार यंदा एकाच दिवशीच आल्याने महाराष्ट्रभरात गणपतीच्या मंदिरात भक्तांनी मोठी गर्दी केली आहे.आज (7 मे ) दिवशी अक्षय्य तृतीया निमित्त महाराष्ट्रातील पुण्याच्या दगडूशेठ मंदिरात, प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची मोठी पहायला मिळाली आहे. दगडूशेठ गणपतीला (Shreemant Dagadusheth Halwai Ganapati) आंब्याची आरास करण्यात आली आहे तर सिद्धिविनायक मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. Akshaya Tritiya 2019 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी SMS, Quotes, Wishes, WhatsApp Status, Images आणि Greetings!

दगडूशेठ मंदिरात आंब्याची आरास

पुण्याच्या दगडूशेठ मंदिरामध्ये आज सुमारे 1100 आंब्यांची आरास करण्यात आली आहे. दरवर्षी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर अशा प्रकारची आरास करण्यात येते. त्यानंतर हे आंबे गरजवंतांना दान केले जातात. युरोपमधे आंब्यांवर घातलेली बंदी उठवली जावी म्हणून ’देसाई बंधू आंबेवाले ' यांच्या मालकांनी गणपतीला साकडे घातले होते. त्यानंतर इच्छापूर्ती झाल्याने कृतज्ञता म्हणून आंब्याची आरास केली जाते. Happy Akshaya Tritiya 2019: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी जाणून घ्या पूजा-विधी शुभ मुहूर्त

दगडूशेठ प्रमाणेच प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिर आणि पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्येही आकर्ष्क फुलांची सजावट करण्यात आली आहे. अक्षय्य तृतीया हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक समजला जातो. यादिवशी दिलेले दान अक्षय म्हणजेच चिरंतन राहते असा समज आहे.