Akshaya Tritiya 2019 Wishes in Marathi: अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक दिवस आहे. या दिवशी कोणत्याच शुभ कार्याला मुहूर्त पाहण्याची गरज नसते. तसेच अक्षय्य तृतीयेदिवशी दानाचं विशेष महत्त्व असतं. या दिवशी दिलेले कोणतचं दान क्षयाला जात नाही. त्यामुळे तुमच्या घरातील नातलगांना, मित्र मंडळींना, यंदाच्या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी व्हॉट्सअॅप मेसेज (WhatsApp Messages), व्हॉट्सअॅप स्टेट्स (WhatsApp Status), फेसबुक मेसेंजरच्या (Facebook Messenger) माध्यमातून अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा देण्यासाठी ही मराठमोळी ग्रिटिंग्स, SMS, Quotes, Wishes, Images शेअर करा आणि आनंद अक्षय ठेवण्यासाठी प्रयत्न करा. Akshaya Tritiya 2019: यंदा 16 वर्षानंतर येणार अद्भुत योग, अक्षय्य तृतीया ठरणार तुमच्यासाठी लाभदायक
अक्षय्य तृतीया शुभेच्छा संदेश
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लक्ष्मीच्या कुमकुम पावलांनी
सुख, समृद्धी तुमच्या घरात नांदो !
अक्षय्य तृतीयेच्या हार्दीक शुभेच्छा
अक्षय्य तृतीयेच्या मंगलदिनी
तुमच्या आयुष्यात सुख,शांती अक्षय राहो!
अक्षय्य तृतीयेच्या हार्दीक शुभेच्छा
अक्षय्य तृतीया या दिवशी अनेक त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार सोन्याची खरेदी करतात. यामध्ये दागिन्यांपासून अगदी सोन्याचं बिस्किट, वळं, कॉईन यांचा समावेश आहे. Gold Purity Guide: अक्षय्य तृतीया दिवशी Gold Coin, वळं, दागिने विकत घेण्यापूर्वी जाणून घ्या 24k, 22k आणि 18k सोन्यातला फरक
अक्षय्य तृतीया शुभेच्छा संदेश व्हिडिओ:
आज डिजिटल मीडियामध्ये सण साजरा करण्याची पद्धत बदलली आहे. आजकाल सोशल मीडियातून शुभेच्छा पाठवल्या जातात. मग यंदा अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा देण्यासाठी या खास मराठमोळ्या शुभेच्छा संदेशांना, ग्रिटिंग्सला शेअर करायला विसरू नका.