Happy Akshaya Tritiya 2019: येत्या 7 मे रोजी सर्वत्र अक्षय्य तृतीया साजरी करण्यात येणार आहे. सनातन धर्मात वैशाख शुक्ल तृतीयेचा मान हा अक्षय्य तृतीयेचा रुपाने मानला जातो. तर यंदाची अक्षय्य तृतीया तुमच्यासाठी फारच लाभदायक ठरणार आहे. त्यामुळे ज्योतिषाचार्य पं. ऋषी द्विवेदी यांच्या अनुसार अक्षय्य तृतीया आणि स्थिर योग यांच्या संयोगामुळे व्रत पर्वासह दान केल्यास ते तुमच्यासाठी फलदायी ठरणार आहे.
अक्षय्य तृतीयेचा दिवशी खासकरुन सोने खऱेदी केली जाते. तसेच काही घरांमध्ये सोने अथवा चांदीमधील लक्ष्मीच्या पावलांची पूजा करतात. तर आपल्या आयुष्यात सुख-समृद्धी येण्यासाठी लक्ष्मीची मनोभावे या दिवशी पूजा केली जाते. सोने खरेदी करण्यासाठी शुभ वेळ ही दुपारी 12.20 ते 2.24 वाजेपर्यंत आहे. परंतु या दिवशी कधीही सोने खरेदी करु शकता.
दैनिक जागरण यांनी दिलेल्या माहितीनुसार, उज्जैन येथील ज्योतिषाचार्य आनंद शंकर व्यास असे म्हणतात की, अक्षय्य तृतीयेचा दिवस हा खरेदीसाठी उत्तम मानला जातो. या दिवशी सोने, चांदी, वस्त्र खरेदी करण्याचे विशेष महत्व आहे.(अक्षय्य तृतीया सणानिमित्त Paytm द्वारे एक रुपयात सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी; पहा काय आहे ऑफर)
तर जालंधर येथील ज्योतिषाचार्य पंडित आदित्य प्रसाद शुक्ला यांच्या मते महिनाभर विविध तिथी येतातय परंतु अक्षय्य तृतीयेचा दिवशी सूर्य आणि चंद्र एकाच राशीत प्रवेश करतात. त्यामुळे या दिवशी शुभ कार्य, खरेदी, दान किंवा पूजा यांचे महत्व अधिक असते. मात्र श्री हरी दर्शन मंदिर अशोक नगर येथील प्रमुख पुजारी पंडित प्रमोद शास्त्री असे सांगतात की, यंदा 16 वर्षानंतर सूर्य, शुक्र, राहू आणि चंद्र उच्च राशी म्हणजे वृषभ मध्ये प्रवेश करणार आहे. त्याचसोबत या दिवशी भगवान परशुराम यांचा अवतार दिवश आणि त्रेता युगाची सुरुवात होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यापूर्वी अशा पद्धतीचा अद्भुत योग 2003 रोजी घडला होता.