अक्षय्य तृतीया सणानिमित्त Paytm द्वारे एक रुपयात सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी; पहा काय आहे ऑफर
Akshaya Tritiya 2019 Paytm Gold Offer | (Archived, Edited, Representative images)

Akshaya Tritiya 2019 Paytm Gold Offer: साडेतीन मुहूर्तांपैकी एक अशा अक्षय्य तृतीयेनिमित्त (Akshaya Tritiya) सोने खरेदी आवार्जून केली जाते. मात्र सोन्याचे दर पाहुनच सोनं खरेदी करण्याकडे लोकांचा कल असतो. मात्र आता तुम्हाला केवळ 1 रुपयांत सोनं खरेदी करता येणार आहे. अक्षय्य तृतीयेनिमित्त पेटीएमने खास ऑफर सुरु केली आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही 1 रुपयांपासून ते 1.50 लाखापर्यंत सोनं खरेदी करु शकता. तुम्ही खरेदी करत असलेलं सोनं 24 कॅरेटचं असून ते लॉकरमध्ये ठेवलं जाईल आणि हवं तेव्हा तुम्ही ते घरी घेऊन जावू शकता, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. (अक्षय्य तृतीयेला का कराल सोन्याची खरेदी? जाणून घ्या यामागील ५ मुख्य कारणं)

पेटीएम द्वारे कसं खरेदी कराल सोनं?

# सर्वप्रथम पेटीएस अ‍ॅपमध्ये जा. तेथे तुम्हाला गोल्ड पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

# सोन्याची खरेदी केल्यानंतर तुमचं सोनं MATC–PMP या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवलं जाईल.

खरेदी केल्यानंतर तुम्ही सोनं विकू देखील शकता.

सोन्याच्या शुद्धतेची 100% हमी पेटीएम देतं.

# किमान 1 ग्रॅम सोनं खरेदी केल्यास ते घरी सुरक्षित पोहोचवलं जातं. यामध्ये 1, 2, 5, 10 आणि 20 ग्रॅम सोन्याचे सिक्के असतात.

# याशिवाय तुम्हाला कॅशबॅक आणि डिजीटल सोनं खरेदी करण्याचा पर्याय देखील दिला जातो.

पेटीएम व्यतिरिक्त Bullion India च्या माध्यमातून देखील तुम्ही सोनं खरेदी करु शकाल. मात्र त्यासाठी तुम्हाला कमीत कमी 300 रुपयांचं सोनं खरेदी करावं लागेल. हे सोनं देखील MATC–PMP लॉकरमध्ये सुरक्षित ठेवलं जाईल आणि घरी सुरक्षित पोहचवण्याची देखील सोय केली जाईल.