अक्षय्य तृतीया (फोटो सौजन्य-फाइल इमेज)

Akshaya Tritiya 2019: वैशाख महिन्यातील शुक्ल तृतीयेला 'अक्षय्य तृतीया' (Akshaya Tritiya) हा सण येतो. हा दिवस ठरविण्यासाठी शास्त्रात सांगितलेल्या नियमाप्रमाणे दिवसाच्या पूर्वार्धात वैशाख शुक्ल तृतीया असेल तो दिवस अक्षय्य तृतीयेचा दिवस समजावा असे सांगण्यात आले आहे. तर आज (7 मे) सर्वत्र अक्षय्य तृतीया साजरी करण्यात येणार आहे.

या तृतीयेला 'अक्षय्य' म्हणतात कारण या दिवशी केलेल्या जप, होम, दान इत्यादी गोष्टी अक्षय फल देणाऱ्या होतात. म्हणूनच या दिवशी चांगले विचार करावेत, चांगले काम करावे, चांगले बोलावे म्हणजे तेही अक्षय्य होऊन जाते.(Happy Akshaya Tritiya 2019: अक्षय्य तृतीया दिवशी जाणून घ्या सोन्याचे आजचे दर)

मुहूर्त –

मंगळवार, 7 मे 2019 - अक्षय्य तृतीया

अक्षय तृतीया पूजा मुहूर्त – सकाळी 05:40 ते दुपारी 12:17 पर्यंत

सोने खरेदी करण्याचा मुहूर्त- सकाळी 6.26 ते रात्री 11.47 पर्यंत

तसेच अक्षय्य तृतीया दिवशी लक्ष्मीच्या पूजेसोबत विष्णूची पूजा करण्याचे सुद्धा अधिक महत्व असते. हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (अविनाशी) होते.