प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

Happy Akshaya Tritiya 2019:अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक दिवस आहे. या दिवशी कोणत्याच शुभ कार्याला मुहूर्त पाहण्याची गरज नसते. तसेच अक्षय्य तृतीयेदिवशी दानाचं विशेष महत्त्व असतं. या दिवशी दिलेले कोणतचं दान क्षयाला जात नाही. तर आजच्या दिवशी खासकरुन लोक सोने खरेदी करताना दिसून येतात.

आजच्या दिवशी सर्वत्र सोन्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे मुंबईत सोन्याचे भाव वाढले असून चांदीच्या दर कमी झाले आहेत. 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर प्रति 10 ग्रॅमसाठी ग्राहकांना 32,346 रुपये मोजावे लागणार आहेत. त्याचसोबत आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे दर बदलत असल्याने गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर वाढत चालले आहेत.(Akshaya Tritiya 2019: जाणून घ्या काय आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक अक्षय तृतीयेचे महत्व; पूजा आणि सोने खरेदीचा शुभ मुहूर्त)

आजचा सोन्याचा दर:

22 कॅरेट प्रति 10 ग्रॅम- 30,806 रुपये

24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम- 32,346

(Gold Purity Guide: अक्षय्य तृतीया दिवशी Gold Coin, वळं, दागिने विकत घेण्यापूर्वी जाणून घ्या 24k, 22k आणि 18k सोन्यातला फरक)

आजकाल सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाणही वाढले आहे.अक्षय्य मुहूर्त हा साडेतीन मुहुर्तापैकी एक असल्याने यादिवशी कोणत्याच शुभ कार्याची सुरूवात करण्यासाठी विशेष मुहूर्ताची वेळ पहाण्याची गरज नसते. सोनं विकत घेताना त्याची शुद्धता तपासून घ्या.हॉलमार्कचे दागिने, त्याचा स्टॅम्प आणि पक्क बिल घेऊनच दागिने विकत घ्या. तुम्हा सर्वांना अक्षय्य तृतीयेचा हार्दिक शुभेच्छा!!