हिंदू धर्मीयांसाठी शुभ कार्यांना कोणतीही वेळ न पाहता कामाचा श्रीगणेशा करण्यासाठी वर्षभरात 4 दिवस हे साडेतीन मुहूर्त म्हणून दिले गेले आहेत. त्यापैकी एक म्हणजे अक्षय्य तृतीया (Akshay Tritiya ). वैशाख शुद्ध तृतीया हा दिवस अक्षय्य तृतीया म्हणून साजरा केला जातो. यंदा अक्षय्य तृतीया 22 एप्रिल दिवशी साजरी केली जाणार आहे. हिंदू बांधवांसोबतच जैन धर्मीय देखील या दिवशी विशेष व्रत ठेवतात. जैन धर्मीय या दिवसाला आखा तीज म्हणतात. मग अशा या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तुमच्या नातेवाईकांना, प्रियजनांना, आप्तांना, मित्रमंडळींना WhatsApp Status, Facebook Messages, Quotes, Greetings द्वारा देत या दिवसाचा आनंद द्विगुणित करू शकता.
अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी सोनं खरेदी, मोठ्या आर्थिक व्यवहारांना सुरूवात, वाहन खरेदी, घर खरेदी, गृह प्रवेश असे मोठे निर्णय घेतले जातात. सोबतच या दिवशी दिले जाणारे दान हे अक्षय असते असते अशीही अख्यायिका आहे त्यामुळे क्षय न पावणार या आशेने दान धर्म देखील केला जातो. वातावरणामध्ये कडक उन्हाळा असल्याने अनेक ठिकाणी पाण्याचे माठ ठेवले जातात. या माध्यमातून वाटसरूंची तहान भागवली जाते. सुगंधित पाण्याने भरलेला घट ब्राह्मणाला दान करण्याची देखील या दिवसाची रीत आहे. यामुळे पितर संतुष्ट होतात अशी धारणा आहे. नक्की वाचा: Akshaya Tritiya 2023 Date: अक्षय तृतीया कधी आहे? तारीख शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या .
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा
ज्या आनंदाची अपेक्षा आहे
ती या अक्षय तृतीयेला पूर्ण होवो
तुम्हा सर्वांना अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा
अक्षय्य तृतीयेच्या मंगलदिनी,
तुमच्या आयुष्यात अक्षय राहो सुख शांती,
अक्षय्य तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा
होईल दर्शन मंगल स्वरूपाचे
करू व्रत या शुभ दिवसाचे
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा
लक्ष्मीचा वास होवो
संकटांचा नाश होवो
शांतीचा वास राहो
धनाची बरसात होवो
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा
माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहो..
तुमच्याकडे अक्षय धनाचा साठा होवो..
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा
अक्षय्य तृतीयेला कृत युग संपून त्रेतायुग सुरू झाले असे मानले जाते. कृषी प्रधान भारत देशात या दिवशी बळीराजा कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलरामाची पूजा करतो. तर महाराष्ट्रामध्ये चैत्र महिन्यात जी चैत्रगौरीची पूजा करून घरात स्त्रियांना बोलावून हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात त्याची सांगता देखील या अक्षय्य तृतीयेच्या सणाच्या निमित्ताने केली जाते.