Akshaya Tritiya 2023 Date: अक्षय्य तृतीयेचा सण वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरा केला जातो. काही ठिकाणी अक्षय्य तृतीयेला 'अखा तीज' असेही म्हणतात. अक्षय म्हणजे - ज्याचा क्षय होत नाही. धार्मिक मान्यतेनुसार अक्षय्य तृतीयेचा दिवस अतिशय शुभ मानला जातो. यावेळी अक्षय्य तृतीया 22 एप्रिल रोजी साजरी होणार आहे. या दिवशी भगवान परशुराम, नर-नारायण आणि हयग्रीव अवतरले होते असे मानले जाते. या दिवशी मौल्यवान वस्तू खरेदी केल्या जातात आणि अनेक वस्तू दान केल्या जातात. (हेही वाचा - Akshaya Tritiya Dos and Don’ts:अक्षय्य तृतीयेला काय करावे, काय करू नये, पाहा)
अक्षय्य तृतीया 2023 शुभ मुहूर्त -
- अक्षय्य तृतीया 22 एप्रिल 2023 - दिवस - शनिवार
- अक्षय्य तृतीया पूजेचा शुभ मुहूर्त - 07:49 ते दुपारी 12:20 पर्यंत आहे.
- पूजेचा एकूण कालावधी 4 तास 31 मिनिटे असेल.
- तृतीया तिथी प्रारंभ - 22 एप्रिल 2023 सकाळी 07:49 पासून
- तृतीया समाप्ती - 23 एप्रिल 2023 सकाळी 07:47 पर्यंत
सोने खरेदीसाठी शुभ काळ -
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याची वेळ 22 एप्रिल 2023 रोजी सकाळी 07.49 ते 23 एप्रिल रोजी सकाळी 05.48 पर्यंत असेल. सोने खरेदीचा एकूण कालावधी 21 तास 59 मिनिटे असेल.
अक्षय्य तृतीया पूजन पद्धत -
या दिवशी सकाळी अंघोळ केल्यावर पिवळे वस्त्र परिधान करावे. तुमच्या घरातील मंदिरात विष्णूजींना गंगाजलाने पवित्र करा. तुळशीला पिवळ्या फुलांची माळ अर्पण करा. नंतर उदबत्ती पेटवा, दिवा लावा आणि पिवळ्या आसनावर बसा, विष्णूजींशी संबंधित ग्रंथाचे पठण करून शेवटी विष्णूजींची आरती वाचा. यासोबतच विष्णूजींच्या नावाने गरिबांना अन्नदान करणे किंवा दान करणे अत्यंत पुण्यकारक आणि फलदायी आहे.
अक्षय्य तृतीयेचे महत्त्व -
अक्षय्य तृतीयेचा दिवस हा वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. ज्याला सर्वात शुभ मानले जाते. या दिवशी अनेक शुभ कार्ये करता येतात. या दिवशी गंगेत स्नान करण्याचेही मोठे महत्त्व सांगितले आहे. जो व्यक्ती या दिवशी गंगेत स्नान करतो, तो निश्चितच सर्व पापांपासून मुक्त होतो. या दिवशी पितृ श्राद्ध करण्याचाही नियम आहे. जव, गहू, हरभरा, सत्तू, दही-तांदूळ, दुधापासून बनविलेले पदार्थ इत्यादी वस्तू ब्राह्मणाला दान करून त्याच्या पूर्वजांच्या नावाने खायला द्याव्यात. या दिवशी कोणत्याही तीर्थक्षेत्री आपल्या पूर्वजांच्या नावाने श्राद्ध आणि तर्पण करणे अत्यंत शुभ आहे.