Coronavirus Vaccine | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

देशभरात कोरोनाच्या (Corona) तिसऱ्या लाटेचा वेग आता कमी होऊ लागला आहे. दररोज करोनाच्या रुग्णांमध्ये पण घट होत आहे. काही तज्ज्ञांच्या मते कोरोना कमी होण्याचे प्रमान लसीकरणामुळेच (Vaccination) साध्य झाले आहे. लस घेण्यासाठी लोक मोठ्या संख्येने पुढे आले नसते, तर देशात आणखी काही करोनाची परिस्थिती निर्माण झाली असती. भारतात कोरोना लसीकरण मोहिमेवर (Corona Vaccination) खूप जोर दिला जात आहे आणि दररोज लाखो लोकांचे लसीकरण केले जात आहे. आतापर्यंत देशभरात कोरोना लसीचे 170 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील कोरोना लसीकरणाची संख्या आता 170.87 कोटी (1,70,87,06,705) च्या वर गेली आहे. मंत्रालयाने सांगितले की 15-18 वयोगटातील किमान एक कोटी मुलांनी लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी ट्विट करून हि माहिती दिली आहे.

Tweet

5.04 कोटी मुंलाना लसीचा पहिला डोस मिळाला

मंत्रालयाने सांगितले की, आतापर्यंत देशातील 5.04 कोटींहून अधिक मुंलाना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. भारतात 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण 3 जानेवारीपासून सुरू झाले आहे. दरम्यान, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने इशारा दिला आहे की कोरोना विषाणूचे ओमाॅयक्रोन प्रकार हे कोरोना विषाणूचे शेवटचे प्रकार नसेल. ते म्हणाले की कोरोनाचे आणखी नवीन प्रकार समोर येवु शकतात. (हे ही वाचा Delhi: AIIMS रूग्णालयाकडून रुग्णाला दाखल होण्याआधी आणि शस्त्रक्रिया करण्यापूर्वी नियमित COVID-19 चाचणी बंद करण्याची घोषणा)

WHOच्या अधिकृत सोशल मीडियावर मंगळवारी आयोजित केलेल्या प्रश्नोत्तराच्या सत्रादरम्यान, संस्थेच्या कोविड-19 तांत्रिक टीमच्या मारिया व्हॅन केरखोव्ह यांनी सांगितले की जागतिक आरोग्य संस्था ओमाॅयक्रोनच्या चार भिन्न प्रकारांवर लक्ष ठेवत आहे. मारिया म्हणाली, 'आम्हाला आता या व्हायरसबद्दल बरेच काही माहित आहे. तथापि, आपल्याला सर्वकाही माहित नाही. अगदी स्पष्टपणे सांगायचे तर, व्हायरसचे हे प्रकार 'वाइल्ड कार्ड' आहेत. अशा परिस्थितीत, आम्ही या विषाणूवर सतत बारकाईने लक्ष ठेवून आहोत, तो कसा बदलतो आणि त्याचे स्वरूप कसे बदलते. तथापि, या विषाणूमध्ये बदल होण्याची शक्यता खूप आहे.