 
                                                                 Loksabha Election 2024: ठिकठिकाणी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. त्यात तिसऱ्या टप्प्यात कर्नाटकमध्ये निवडणूक ड्युटीवर तैनात असलेल्या दोन सरकारी कर्मचाऱ्यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. एक कर्मचारी शाळेतील मुख्याध्यापक होते तर दुसरे कृषी विभागाशी संबधित अधिकारी होते. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा- महाडमध्ये मतदानासाठी निघालेल्या मतदाराचा मृत्यू; रस्त्यातच चक्कर येऊन कोसळले)
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील बागलकोट तालुक्यातील बिदरी सरकारी शाळेचे मुख्याध्यापक गोविंदप्पा सिध्दापूर (48) यांचं मुधोळ बसस्थानकावर ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सोमवारी सकाळी ते जमखंडी विधानसभा मतदारसंघांर्गत मैगुरु मतदान केंद्रावर जात होते. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. सिध्दापूर यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुली आहे.
त्यानंतर दुसरे कृषी अधिकारी आनंद तेलंग (32) यांचा सोमवारी सकाळी ह्रदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाला. बीदर जिल्ह्यातील कुडुंबल येथील सहाय्यक कृषी अधिकारी आहे. दोन्ही घटनेनंतर परिसरात गोंधळ उडाला होता. या आधी पश्चिम बंगालच्या निवडणूक केंद्रावर पहिल्या टप्प्यात CRPF जवानाचा मृतदेह आढळून आला होता. निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी मंगळवारी पीटीआयला या संदर्भात माहिती दिली होती.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
