India's GDP Growth: राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने बुधवारी चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्या तिमाहीतील (जुलै-सप्टेंबर) जीडीपी अंदाज जाहीर केला. जुलै-सप्टेंबर 2022 या तिमाहीत भारताचा GDP 6.3 टक्के नोंदवला गेला आहे. आरबीआयने आपल्या शेवटच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत अर्थव्यवस्थेचा विकास दर 6.3 टक्के राहण्याचा अंदाजही वर्तवला होता. SBI ने दुसऱ्या तिमाहीत भारताच्या GDP वाढीचा अंदाज 5.8 टक्के ठेवला होता. हे सरासरी अंदाजापेक्षा 30 बेसिस पॉइंट्स कमी आहे. कमकुवत उत्पादन क्रियाकलापांमुळे जीडीपी घसरला आहे.
मागील तिमाहीच्या तुलनेत घट -
चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत देशाचा सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) वाढीचा दर 13.5 टक्के नोंदवला गेला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत तो 20.1 टक्के होता. आर्थिक वर्ष 2021-22 (Q4FY22) च्या चौथ्या तिमाहीत, देशाच्या GDP मध्ये केवळ 4.1 टक्के वाढ नोंदवली गेली. 2021-22 या आर्थिक वर्षासाठी एकूण GDP 8.7 टक्क्यांनी वाढला आहे. या दोन्ही आकडेवारीचा विचार करता, चालू आर्थिक वर्षातील एप्रिल-जून या तिमाहीतील आकडेवारी दिलासा देते. (हेही वाचा - India's Economic Growth: IMF कडून भारताच्या GDP वाढीच्या अंदाजात घट; आर्थिक वर्ष 2022 मध्ये 12.5 ऐवजी 9.5 टक्के असेल विकास दर)
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 2021-22 च्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) 8.4 टक्क्यांनी वाढले. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था 13.5 टक्के वाढीचा दर निम्म्यावर येईल, असा विश्लेषकांचा अंदाज होता.
रेटिंग एजन्सी ICRA च्या मते, GDP 6.5 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज होता, तर स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या अहवालात जुलै-सप्टेंबर 2022 साठी 5.8 टक्के वाढीचा अंदाज वर्तवला होता. चीनने जुलै-सप्टेंबर 2022 मध्ये 3.9 टक्के आर्थिक विकास दर नोंदवला. (हेही वाचा -Covid-19 च्या दुसऱ्या लाटेमुळे Indian Economy ला झटका; Moody's ने घटवला GDP वाढीचा अंदाज)
अनेक विश्लेषकांना सणासुदीच्या हंगामामुळे दुसऱ्या तिमाहीच्या अखेरीस घरगुती खर्चात मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे. रॉयटर्सच्या सर्वेक्षणानुसार, आशियातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था सप्टेंबर तिमाहीत 6.2% ची वार्षिक वाढ नोंदवेल. मागील तिमाहीत 13.5% च्या स्फोटक वाढीच्या तुलनेत हे काही प्रमाणात समाधानकारक आहे.