Covid-19 च्या दुसऱ्या लाटेमुळे Indian Economy ला झटका; Moody's ने घटवला GDP वाढीचा अंदाज
भारतीय अर्थव्यवस्था | प्रतीकात्मक फोटो (संग्रहित संपादित प्रतिमा)

कोरोना विषाणू (Coronavirus) महामारीदरम्यान भारतीय अर्थव्यवस्थेची (Indian Economy) ढासळलेली स्थिती सावरण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करत आहेत. अशात आगामी काळात देशाची जीडीपी वाढ (GDP Growth) चांगली होईल असा विश्वास जागतिक रेटिंग एजन्सी मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने (Moody's Investors Service) व्यक्त केला आहे. जूननंतर परिस्थिती सुधारेल आणि भारताच्या आर्थिक घडामोडी वाढतील असा मूडीजचा विश्वास आहे व यामुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल असेही सांगण्यात आले आहे. मात्र मूडीजने 2021 मध्ये जीडीपीमध्ये 9.6 टक्के ग्रोथचा अंदाज लावला आहे. मूडीजने 2021 या वर्षातील भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज कमी करून 9.6 टक्के केला आहे. पूर्वी हा अंदाज 13.9 टक्के होता.

मूडीजने 'Macroeconomics India: Economic shocks from second COVID wave will not be as severe as last year's', या अहवालात म्हटले आहे की उच्च वारंवारता आर्थिक निर्देशक असे दर्शवित आहेत की देशात एप्रिल आणि मेमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली व त्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. मात्र, राज्यांद्वारे निर्बंध लादल्याने यात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.

अहवालात म्हटले आहे की, कोरोनाचा संसर्ग वाढल्याने 2021 मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या अंदाजाविषयी अनिश्चितता वाढली आहे. परंतु आर्थिक नुकसान हे फक्त एप्रिल ते जून या तिमाहीतच मर्यादित राहण्याची शक्यता आहे. मूडीजने पुढे सांगितले की, '2021 मध्ये भारताचा वास्तविक जीडीपी 9.6 टक्के आणि 2022 मध्ये 7 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे.' भारतीय अर्थव्यवस्था 2020-21 आर्थिक वर्षात 7.3 टक्क्यांनी घसरली आहे, तर त्याआधीच्या वर्षी त्यामध्ये 4 टक्क्यांची वाढ झाली होती. (हेही वाचा: विजय माल्या, निरव मोदी, मोहुल चौक्सी यांच्यावर ED ची कारवाई; 9,371 कोटी रुपयांची संपत्ती बँकांकडे हस्तांतरीत)

मूडीजने पुढे सांगितले की, निर्बंध शिथिल झाल्यानंतर देश-विदेशात 'मागणी' वाढली आहे. यामुळे अलिकडच्या काही महिन्यांत मॅन्युफॅक्चरिंग आउटपुटला चालना मिळाली आहे. आम्हाला पुढील काही तिमाहीत खासगी खप आणि अनिवासी गुंतवणूकीची अपेक्षा आहे, ज्यामुळे 2021 मध्ये देशांतर्गत मागणीत सुधारणा होईल.’