RBI Governor Shaktikanta Das on Economy: अर्थव्यवस्थेला गती देण्याची जबाबदारी कोणाची? आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास काय म्हणतात पाहा
RBI Governor Shaktikanta Das | (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संटामुळे घेण्यात आलल्या लॉकडाऊन आणि देशात उद्भवलेली स्थिती यातून देश हळूहळू सावरत आहे.देश अद्यापही कोरोना व्हायरस संकटाच्या सावटाखाली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था (Indian Economy) सावरण्यास काहीसा विलंब लागेल. देश हळूहळू पूर्व पदावर येत आहे. मात्र, देशातील अर्थव्यवस्थेला गती देण्याची जबाबदारी सर्वांची आहे. अर्थव्यवस्था उभारणीतील गती वाढवण्यासाठी खासगी क्षेत्रांनीही योगदान द्यायला हवे. ती जबाबदारी खासगी क्षेत्रांचीही आहे, असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर (RBI Governor) शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी म्हटले आहे.

उद्योग संगटना फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (Federation of Indian Chambers of Commerce & Industry) म्हणजेच फिक्कीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात शक्तिकांत दास बोलत होते.

या वेळी बोलताना शक्तिकांत दास म्हणाले की, दुसऱ्या तिमाहीमध्ये अर्थव्यवस्थेत बऱ्यापैकी बदल झालेला पाहायला मिळत आहे. जागतिक बॅंकेच्या निरिक्षणांचा हवाला देत दास यांनी म्हटले की, कोराना संकटामुळे निर्माण झालेल्या स्थितीतून सावरण्यासाठी कोणता एखादाच देश नव्हे तर अवघ्या जगालाच विलंब लागणार आहे. (हेही वाचा, What is Doorstep Banking?: अर्थमंत्री Nirmala Sitharaman यांनी केले डोअरस्टेप बँकिंग सेवांचे अनावरण; जाणून घ्या नक्की काय आहे ही सेवा व मिळणाऱ्या सुविधा)

आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, आरबीआयने मोठ्या प्रमाणावर लिक्विडिटी इन्फ्यूजन केले आहे.ज्यामुळे सरकारकडून कमी दराने आणि गैर-विघटनकारी (Non-disruptive) पद्धतीने मोठ्या प्रमाणावर सेवा निश्चित करण्याचे काम केले आहे. याशिवाय लक्विडिटी आणि इन्फ्यूजनने इतर क्षेत्रातही चांगले काम केले आहे.

शक्तिकांत दास यांनी पुढे बोलताना असेही सांगितले की, शिक्षण क्षेत्राचा देशाच्या विकासात मोठा वाटा राहतो. त्यामुळे नवी शिक्षण निती ऐतिहासिक आहे. नव्या काळासोबत वाटचाल करण्यासाठी ती आवश्यक आहे.अर्थव्यवस्था वेगवान होण्यासाठी खासगी क्षेत्र, पर्यटन, हॉटेलींग व्यवसाय आणि इतर नाविन्यपूर्ण क्षेत्रांनीही मोठी जबाबदारी खांद्यावर घेणे आवश्यक असते.