What is Doorstep Banking?: अर्थमंत्री Nirmala Sitharaman यांनी केले डोअरस्टेप बँकिंग सेवांचे अनावरण; जाणून घ्या नक्की काय आहे ही सेवा व मिळणाऱ्या सुविधा
अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Photo Credits-ANI)

केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी काल, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून दिल्या जाणाऱ्या डोअरस्टेप बँकिंग सेवेचे (Doorstep Banking Services) उद्घाटन केले. त्या ईएएसई बँकिंग सुधारणा निर्देशांकानुसार उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बँकांचा सत्कार करण्यासाठी पुरस्कार समारंभात सहभागी झाल्या होत्या. ईएएसई सुधारणांचा एक भाग म्हणून, कॉल सेंटर, वेब पोर्टल किंवा मोबाइल ॲपच्या सार्वत्रिक टच पॉइंट्सद्वारे ग्राहकांना त्यांच्या दारात बँकिंग सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी, डोअरस्टेप बँकिंग सेवेची कल्पना मांडण्यात आली. या सुविधांच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांच्या सेवा विनंतीचा मागोवा घेता येईल.

या सेवा देशभरातील 100 केंद्रांवर निवडलेल्या सेवा पुरवठादारांद्वारे नियुक्त केलेल्या डोअरस्टेप बँकिंग एजंट्सद्वारे सादर केल्या जातील.

सध्या पुढील सेवा उपलब्ध आहेत-

केवळ बिगर -आर्थिक सेवा उदा. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट घेणे (चेक/डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डर इ.), नवीन चेक बुक स्लिप घेणे, 15G /15H फॉर्म घेणे, आयटी/जीएसटी चलान घेणे, स्थायी सूचनांसाठी विनंती, अकाउंट स्टेटमेंट विनंती, वैयक्तिकृत नसलेली चेक बुक वितरण, डिमांड ड्राफ्ट, पे ऑर्डर, मुदत ठेव पावती देणे, पोचपावती इ. टीडीएस/फॉर्म 16 प्रमाणपत्र देणे, प्री-पेड इन्स्ट्रुमेंट/गिफ्ट कार्डची डिलिव्हरी ग्राहकांना उपलब्ध आहे. ऑक्टोबर 2020 पासून आर्थिक सेवा उपलब्ध करुन देण्यात येतील.

या सेवा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या ग्राहकांना नाममात्र शुल्कात घेता येतील. या सेवेचा फायदा सर्व ग्राहकांना, विशेषत: ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांना होईल ज्यांना या सेवांचा लाभ घेणे सुलभ होईल.

या सेवांचे अनावरण करण्यासोबतच अर्थमंत्र्यांनी ईएएसई 2.0 (EASE2.0) निर्देशांक निकाल घोषित केले. पीएसबी, ईएएसई साठी एक सामान्य सुधारणा कार्यक्रम आहे ज्याचा उद्देश स्वच्छ आणि स्मार्ट बँकिंग संस्थात्मकीकरण करणे आहे. जानेवारी 2018 मध्ये याची सुरुवात करण्यात आली आणि त्यानंतरच्या कार्यक्रमाची आवृत्ती- EASE 2.0 ईएएसई 1.0 मध्ये केलेल्या पायाभरणीवर उभी राहिली. EASE 2.0 मधील सुधारणा कृती मुद्दयांचा उद्देश सुधारणा प्रवास अपरिवर्तनीय बनवणे, प्रक्रिया आणि प्रणाली मजबूत करणे आणि याचे परिणाम दाखवणे हा आहे.

(हेही वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचे उद्धघाटन; शेतकऱ्यांसाठी ई-गोपाला अॅप सुरू)

EASE 2.0 सुधारणा कार्यक्रम सुरू झाल्यापासून पीएसबींनी चार तिमाहींमध्ये कामगिरीत चढता आलेख दाखविला आहे. मार्च -2019 आणि मार्च - 2020 या कालावधीत पीएसबींच्या एकूण गुणांमध्ये स्कोअरमध्ये 37%वाढ झाली असून, सरासरी ईएएसई निर्देशांक 49.2 वरून 67.4 पर्यंत सुधारला आहे. सर्वाधिक प्रगती सुधारणा कार्यक्रमाच्या सहा संकल्पनांमध्ये दिसून आली. . 'रिस्पॉन्सिबल बँकिंग', 'गव्हर्नन्स अँड एचआर', 'एमएसएमईसाठी उद्यमीमित्र म्हणून पीएसबी' आणि 'क्रेडिट ऑफ टेक' या संकल्पनांमध्ये सर्वाधिक सुधारणा दिसून आली.