भारतीय राजकारणातील एक प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) यांची आज (13 डिसेंबर) मृत्यू पश्चात पहिलीच जयंती आहे. पर्रीकर हे मुंबई आयआयटीचे (IIT Mumbai) 1998च्या बॅचचे ते अभियांत्रिकी विषयाचे पदवीधर आहेत.भारतीय राजकारणातील उच्चपदविधर म्हणून ओळखले जात. देशातील सर्वात छोटे राज्य गोवा (Goa) येथून पर्रीकर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत प्रवेश घेतलेले पर्रीकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री व नंतर केंद्रीय संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी महत्वपूर्ण कामे पार पाडली. नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या टर्म मधील मंत्रिमंडळात 2014 ते 2017 या कालावधीत पर्रिकर यांनी संरक्षण मंत्री पदाचा कार्यभार सांभाळला. संरक्षण मंत्री म्ह्णून काम करताना पर्रीकर यांनी घेतलेले निर्णय देशाच्या राजकीय भौगलिक इतिहासात मोठे बदल घडवणारे ठरले. पाक व्याप्त काश्मीर वर केलेला पहिला वाहिला सर्जिकल स्ट्राईक (Surgical Strike), राफेल डिल (Rafale Deal), हे त्यांच्या कार्याचे काही बहुचर्चित भाग आहेत.
आज मनोहर पर्रीकर यांच्या जयंती प्रित्यर्थ आपण जाणून घेणार आहोत पर्रीकर यांचे 5 मुख्य निर्णय..
- पर्रीकर यांच्या तीन वर्षाच्या कार्यकाळात सर्वात लक्षवेधी ठरलेला निर्णय म्हणजे उरी वर केलेला सर्जिकल स्ट्राईक, जम्मू आणि काश्मीर मधील उरी या प्रदेशात 19 भारतीय जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर प्रत्युत्तर देताना सप्टेंअबर 2016 मध्ये हा सर्जिकल स्ट्राईक घडवला होता.
- संरक्षण दलाशी संबंधित प्रलंबित निर्णय मार्गी लावताना पर्रीकर यांनी हलक्या वजनाचे लढाऊ विमान तेजस याची भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात समाविष्ट करून घेतले, संरक्षण दलाची क्षमता वाढवण्यासोबतच या विभागात स्वदेशीकरणाच्या दृष्टीनेही हे मोठे पाऊल होते.
- मनोहर पर्रीकर यांनी फ्रान्सचे संरक्षणमंत्री जीन-यवेस ले ड्रायन यांच्याबरोबर दसॉल्ट एव्हिएशन एसएकडून 36 राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी करार केला. सप्टेंबर 2016 मध्ये सुरू झालेल्या राफेल जेट डील वर अनेक राजकीय वाद सुरु झाले.
- संरक्षण क्षेत्रात एफडीआय 49 टक्क्यांवरून 74 टक्क्यांपर्यंत वाढविला. मनोहर पर्रिकर: सर्वासामान्य माणूस ते राजकीय नेता आणि व्यक्तिमत्व वैशिष्ट्ये
-भारतीय सैन्यात एक रँक, एक-पेन्शन योजना आणि ओआरओपी या निर्णयांनी पर्रीकर यांनी मोठे योगदान दिले.
याशिवाय ,स्वदेशी उद्योगांच्या विकासावर भर देण्यात, क्षेपणास्त्रांच्या विकासात पर्रीकर यांनी विशेष लक्ष केंद्रित केले होते. पर्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली, एमओडीने रशियाच्या उत्पादकांशी दारूगोळा खरेदी करारासाठी सरकारकडे आपत्कालीन आर्थिक अधिकार वापरण्याची विनंती केली होती.
मनोहर पर्रीकर यांचे वयाच्या 63व्या वर्षी स्वादुपिंडाच्या कॅन्सरमुळे निधन झाले मात्र मृत्यूपूर्वी देखील त्यांनी अगदी शेवटच्या क्षणांपर्यत आपले काम बंद केले नव्हते. किंबहुधा म्ह्णूनच अत्यंत प्रामाणिक व कार्यतत्पर नेते म्ह्णून त्यांची ओळख आहे.