Congress: कॉंग्रेस नेते राहुल गांधीसह मल्लिकार्जुन खरगे यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
Rahul Gandhi | (Photo Credits: Facebook)

नॅशनल हेराल्ड (National) प्रकरणात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना  ED कडून समन्स बजावण्यात आला होता. त्यावेळी सोनिया गांधींना कोरोना (Corona) झाल्यामुळे त्या ईडी चौकशीसाठी उपस्थित राहिल्या नव्हत्या आणि त्यांनी ईडीकडे पुढची तारीख मागितली होती. त्यानुसार सोनिया गांधीं  ED कडून नव्याने समन्स बजावण्यात आला असुन या समन्सनुसार सोनिया गांधींना 26 जुलै म्हणजे आज  ईडी चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्याचं पार्श्वभुमिवर काँग्रेस (Congress) जोरदार आक्रमक झाली असून दिल्लीसह (Delhi) देशभरात आंदोलने सुरु आहेत. या दोलनात कॉंग्रेसमधील सर्व खासदार, AICC महासचिव आणि CWC सदस्य दिल्लीत (Delhi) होणाऱ्या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

 

या आंदोलनात कॉंग्रेसचे जेष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge), दिपेंद्र हुड्डा (Dependra Hudda), राहुल गांधींसह (Rahul Gandhi) अनेक बडे नेते सहभागी झाले आहेत. तर या तीव्र आंदोलना दरम्यान कॉंग्रेस नेते राहुल गांधींसह अनेकांना दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी मलिक्काजुन खरगे यांनीही ताब्यात घेतले असुन यावर खरगेंनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडल आहे. खरगे म्हणाले, विरोधी पक्ष पूर्णपणे नष्ट करण्याचा आणि आमचा आवाज दाबण्याचा पंतप्रधान मोदी (PM Modi) आणि गृहमंत्री अमित शाह (HM Amit Shah) यांचा कट आहे. पोलिसांच्या सूचनेनुसार आम्ही आंदोलन करत आहोत मग आम्हाला ताब्यात घेण्याचं कारण काय असा सवाल विचारत खरगेंनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. (हे ही वाचा:-Rahul Gandhi On PM Modi: अग्निपथ योजनेवरुन राहुल गांधींचा पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल)

 

यापूर्वी राहुल गांधी यांनाही ईडीनं (ED) चौकशीसाठी समन्स बजावला होता. राहुल गांधी (Rahul Gandhi) मात्र ईडी चौकशीसाठी उपस्थित राहिले होते. पण तेव्हा देखील कॉंग्रेस आक्रमक झाल्याचं चित्र बघायला मिळालं होत. आज पुन्हा केंद्र सरकारला आव्हान देतं कॉंग्रेसकडून निदर्शने करण्यात आली. तसेच आम्ही घाबरणार नाही, आमचा लढा सुरूच असेल असा इशारा कॉंग्रेसचे जेष्ठ नेते मलिक्काजुन खरगे यांनी मोदी सरकारला दिला आहे. तर आम्हाला महागाई (Inflation), बेरोजगारी (Unemployment) यावर चर्चा करायाची आहे पण पोलिस आम्हाला ताब्यात घेत आहे असा घणाघात राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर (Central Government) केला आहे.