गेल्या महिनाभऱ्यापासून केंद्र सरकारच्या (Central Government) अग्निपथ योजनेवरून (Agnipath Scheme) देशभरात क्रिया प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. आता काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी देखील यावरुन पंतप्रधान नरेंद्र (PM Modi) मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. पंतप्रधानांच्या प्रयोग शाळेतील या नव्या प्रयोगामुळे देशाची सुरक्षा (National Security) आणि तरुणांचं भविष्य दोन्ही देशोधडीला लागलं असल्याची बोचरी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी याबाबत एक ट्विट (Tweet) केले आहे. या ट्विटमध्ये म्हटले आहे की, दरवर्षी 60 सैनिक निवृत्त (Retired) होतात त्यापैकी फक्त 3 हजार सैनिकांना सरकारी नोकरी (Government Job) मिळते. आता 4 वर्षाच्या कंत्राट पध्दतीवर असलेल्या अग्निवीरांचं भविष्य काय असेल अशी चिंता राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे.
यापूर्वीही राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी यावरून पंतप्रधान नरेंद्र ( PM Modi ) मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना ज्या प्रकारे वादग्रस्त कृषी कायदे मागे घ्यावे लागले, त्याच पद्धतीने त्यांना 'अग्निपथ' योजना मागे घ्यावी लागेल. भारतीय जनता पक्षाचे (BJP) सरकार आठ वर्षांपासून 'जय जवान, जय किसान'च्या (Jai Jawan Jai Kisan) मूल्यांचा अवमान करत आहे, अशी टीका राहुल गांधी केली होती. पण यावेळी युवा पिठीच्या भविष्याची आणि देशाच्या सुरक्षेची चिंता दर्शवत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे तरी अग्निवीर संबंधीत केंद्र सरकार पुढे काय पावलं उचलणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. (हे ही वाचा:-Asaduddin Owaisi: पंतप्रधान मोदी मुस्लिमांना दुसऱ्या दर्जाचे नागरिक बनवत आहेत, खा.असदुद्दीन ओवैसींचं केंद्र सरकार टीकास्त्र)
60,000 सैनिक हर साल रिटायर होते हैं, उनमें से सिर्फ 3000 को सरकारी नौकरी मिल रही है।
4 साल के ठेके पर हज़ारों की संख्या में रिटायर होने वाले अग्निवीरों का भविष्य क्या होगा?
प्रधानमंत्री की प्रयोगशाला के इस नए Experiment से देश की सुरक्षा और युवाओं का भविष्य दोनों खतरे में हैं।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 24, 2022
अग्निवीर या योजनेनुसार चार वर्षांसाठी विशेष सैन्य भरती करण्यात येणार आहे. चार वर्षांनंतर सैनिकांच्या सेवांचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर काही सैनिकांची सेवा वाढवली जाऊ शकते. तर बाकीचे सैनिक निवृत्त होतील. या चार वर्षांच्या नोकरीमध्ये सहा आणि नऊ महिन्यांचे प्रशिक्षण देखील असणार आहे. चार वर्षांच्या निवृत्तीनंतर या सैनिकांना पेन्शन (Pension) मिळणार नाही. परंतु, एकरकमी रक्कम दिली जाईल. या योजनेवर सर्वस्तरातून विविध प्रतिक्रीया येताना दिसत आहेत.