Fractured Leg | (Photo credit: archived, edited, representative image)

बिहारमधील मिनापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात (Bihar Hospital) एका तरुणाच्या फ्रॅक्चर झालेल्या पायावर प्लास्टर (Plaster) करण्याऐवजी कार्डबोर्डच्या (Cardboard) पुठ्ठ्याने उपचार करण्यात आले आहेत. नीतीश कुमार अस पीडित व्यक्तीचे नाव आहे. दुचाकीला झालेल्या अपघातामुळे नितीश कुमार यांच्या पायाला दुखापत झाली. मुझफ्फरपूरच्या श्रीकृष्ण वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांना या रुग्णालायत दाखल करण्यापूर्वी नजिकच्या आरोग्य केंद्रात त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले होते. या उपचारादरम्यान त्याच्या पायाला कागदी पुठ्ठ्यांनी उपचार केल्याचे सांगितले जात आहे.

नीतीश कुमार यांच्यावर उपचार सुरु

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितनुसार, नीतीश कुमार यांच्यावर पाठिमागील पाच दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कुटुंबीयांचा आरोप आहे की, कोणत्याही डॉक्टरने त्यांची भेट घेतली नाही किंवा तात्पुरत्या स्प्लिंटच्या जागी योग्य प्लास्टर केला नाही. रूग्णालयातील व्हिडिओंमध्ये तो तरुण पलंगावर पडलेला दिसतो. त्याचा पाय अजूनही पुठ्ठ्याने आणि जीर्ण झालेल्या पट्टीने बांधलेला दिसत आहे. कुमार यांनी सांगितले की अपघात झाला तेव्हा ते त्यांच्या मोटारसायकलवरून मीनापूरला जात होते. ज्यामुळे आरोग्य केंद्रात सुधारित उपचार करण्यात आले आणि त्यांना वैद्यकीय महाविद्यालयात पुढे पाठविण्यात आले. (हेही वाचा, Mumbai: चुकीच्या वैद्यकीय प्रक्रियेसाठी रुग्णालयाने व्यक्तीला 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली)

प्रकरणाची चौकशी सुरु

प्रसारमाध्यमांतून वृत्त झळकताच हॉस्पिटलच्या अधीक्षक डॉ. विभा कुमारी यांनी म्हटले की, रूग्णावर तातडीने उपचार केले जातील. प्रशासनाही तातडीने उपचार करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. तसेच, कुमार यांना योग्य वैद्यकीय सेवा का मिळाली नाही आणि कार्डबोर्ड स्प्लिंट प्लास्टर कास्टने का बदलले गेले नाही, याबाबतही चौकशी सुरु केल्याची माहिती अधीक्षकांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. (हेही वाचा, Tongue Surgery Instead of Fingers: बोटांवरील उपचारांसाठी जिभेवर शस्त्रक्रिया; कोझिकोड मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय निष्काळजीपणा, 4 वर्षांच्या मुलगी पीडिता)

दरम्यान, रुग्णांना वेळेवर बेड न मिळणे, रुग्णालयात जाण्यासाठी आवश्यकतेनुसार रुग्णवाहिका उपलब्ध नसणे यांसारख्या बाबी आजही सामान्य समजल्या जातात. भारतामध्ये अनेक रुग्ण केवळ वेळेत वैद्यकीय उपचार मिळाले नसल्यामुळे दगावले जाण्याचे प्रमाण मोठे आहे. अनेकदा रुग्णाला वैद्यकीय मदतीची आवश्यकता असते. मात्र, अनेकदा भौगोलिक परिस्थिती, साधनसुविधांचा अभाव असल्याने त्यांना वैद्यकीय मदत वेळेत पोहोचत नाहीत परिणामी रुग्णांच्या जीवावर बेतते. अनेकदा अशा घटना अपघात, बाळंतपण अथवा अशा प्रकरणांमध्ये घडताना आढळतात. आजही धावती बस, ट्रेन अथवा रस्त्यातच महिला बाळंत होण्याच्या अनेक घटना पाहायला मिळतात. त्यामुळे असे प्रकार होऊ नयेत आणि रुग्णांना वेळेत आरोग्यसेवा मिळावी यासाठी राज्य सरकारने प्रशासकीय पातळीवर यंत्रणा कार्यन्वित करावी अशी मागणी होते. दरम्यान, अलिकडील काळात नागरिकांमध्येही जनजागृती झाल्याचे पाहायला मिळते.