स्त्री पुरुष असमानता: आपला भारत बांग्लादेश, श्रीलंका देशांच्याही पाठीमागे, यादीत मिळाले चक्क 112 वे स्थान
gender gap | (Images for symbolic purposes only । Photo Credits: pixabay)

World Economic Forum Report 2019: महिलांचे आरोग्य, आयुर्मान आणि आर्थिक भागिदारी यांसह विविध क्षेत्रात भारताची कामगिरी अगदीच सुमार दर्जाची असल्याचे पुढे आले आहे. जगभरातील स्त्री-पुरुष समानता या विषयावर करण्यात आलेल्या एका सर्वेक्शन अहवालातून ही माहिती पुढे आली आहे. जागतिक आर्थिक मंच (World Economic Forum) ने हे सर्वेक्शन करुन हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार जगभरातील देशांच्या तुलनेत भारताचे स्थान आगोदरच्या स्थानावरुन चार पायऱ्यांनी घसरुन ते तब्बल 112 व्या क्रमांकावर पोहोचले आहे. विशेष म्हणजे, आरोग्य आणि आर्थिक भागिदारी या मुद्द्यावर भारत श्रीलंका, नेपाळ, ब्राजील, इंडोनेशिया आणि बांग्लादेश या देशांच्याही पाठिमागे आहे. या आधी भारत 108 व्या स्थानावर होता. मात्र, आता भारताचे स्थान घसरुन ते 112 वर पोहोचले आहे.

जागतिक आर्थिक मंच द्वारा करण्यात आलेल्या सर्वेक्शनात चीन (106), श्रीलंका (102), नेपाल (101), ब्राजील (92), इंडोनेशिया (85) आणि बांग्लादेश (50) व्या क्रमांकावर आहे. जागतिक बँकेने आपला पहिला स्त्री पुरुष असमानता अहवाल 2006 मध्ये सादर काला होता. त्या वेळी भारत या क्षेत्रात 98 व्या स्थानावर होता. आज भारताचे स्थान घसरताना दिसत आहे. 2006 मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानंतर आतापर्यंत चारपैकी तीन टप्प्यांवर भारताची घसरण झाली आहे. यात राजकीय शक्तिकरण, आर्थिक भागिदारी आणि शैक्षणीक उपलब्धता यांचा समावेश आहे. या तिन्ही टप्प्यांवर भारत अनुक्रमे 150, 149 आणि 112 व्या क्रमांकावर आहे.

जागतिक आर्थिक मंचने म्हटले आहे की,आर्थिक मुद्यावर भारत (35.4 टक्के), पाकिस्तान (32.7 टक्के), यमन (27.3 टक्के), सीरिया (24.9 टक्के) आणि इराक (22.7 टक्के) इतक्या मर्यादीत प्रमाणवर आहेत. भारताचा समावेश त्या देशांमध्ये होतो जिथे कंपनीच्या निदेशन मंडळात महिलांचे प्रतिनिधित्व 13.8 पेक्षाही कमी आहे. (हेही वाचा, International Men’s Day 2019: जागतिक पुरुष दिनानिमित्त नेटीझन्सने ट्वीटरच्या माध्यमातून शेअर केल्या शुभेच्छा, ग्रिटिंग्स)

World Economic Forum ने म्हटले आहे की, महिलांचे आरोग्य आणि उपजिवीका यांमध्ये चार मोठे देश-भारत, व्हियेतनाम, पाकिस्तान आणि चीन यांची स्थीत फारच दयनिय आहे. लाखो महिलांचे जीवनमान पुरुषांच्या तुलनेत सामान्य सेवांपर्यंतही पोहोचला नाही. मंचने भारतात 100 मुलांपाठीमागे 91 मुली इतक्या प्रामाणावर चिंता व्यक्त केली आहे. स्त्री पुरुष तुलनेत असलेली आर्थिक असमानात असलेल्या देशांमध्ये भारत एक मोठा देश आहे.