Representational Image (Photo Credits: File Image)

आज जागतिक स्तरावर पुरुष दिन साजरा केला जात आहे. पुरुष दिन साजरा करण्यामागील मुख्य हेतू म्हणजे,पाळण्याची मुख्य कल्पना म्हणजे त्यांच्या आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करणे, लैंगिक समानता, लैंगिक भेदभाव अधोरेखित करणे, पुरुषांचे समाजातील योगदान आणि पुरुषांशी संबंधित कलंक संपवणे हा आहे. तर  जागतिक पुरुष दिनानिमित्त नेटीझन्सकडून विचार, GIF, शुभेच्छा एकमेकांना दिल्या जात आहेत. तसेच ट्वीटरवर #InternationalMensDay हा हॅशटॅग ट्रेन्ड करत आहे.

जागतिक पुरुष दिन साजरा करण्यामागील इतिहासाबाबत बोलायचे झाल्यास,  अमेरिकेच्या मिसौर युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर थॉमस योस्टर यांच्या प्रयत्नांतून 7 फेब्रुवारी 1992 अमेरिका, कॅनडा आणि काही युरोपीय देशांनी एकत्र येऊन जागतिक पुरुष दिन साजरा केला होता. मात्र यानंतर प्रत्येक देश विविध दिवशी हा दिवस पाळू लागला. मात्र 1998 मध्ये त्रिनिदाद और टोबैगो या देशातील डॉ. जीरोम तिलकसिंह यांच्या पुढाकाराने हा दिवस जागतिक स्तरावर साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी 19 नोव्हेंबर हा दिवस निवडण्याचे कारण असे की, याच दिवशी या देशाची फुटबॉल टीम पहिल्यांदा विश्वचषकात क्वालिफाय झाली होती. तसेच हा दिवस डॉ. जीरोम यांचा जन्मदिवस देखील आहे.

दुसरीकडे भारतात 'सेव इंडियन फॅमिली' या संस्थेतर्फे 2007 साली जागतिक पुरुष दिन हा भारतात साजरा करण्याची पद्धत सुरु करण्यात आली. यापाठोपाठ 'ऑल इंडिया मेन्स वेल्फेयर असोसिएशन' तर्फे भारतात महिला विकास मंत्रालयासोबतच पुरुष विकास मंत्रालय देखील स्थापन करण्याची मागणी देखील करण्यात आली.(Happy International Men's Day 2019 HD Images: जागतिक पुरुष दिनाच्या शुभेच्छा देणारे Greetings, Wallpapers, WhatsApp Status शेअर करून द्या तुमच्या मित्रपरिवाराला खास संदेश)

जागितक पुरुष दिन सेलिब्रेशनचे मेसेज

प्रतिवर्षीप्रमाणे यंदा 19 नोव्हेंबर रोजी भारतात या दिवसाचे सेलिब्रेशन होणार असून यंदा "पुरुष आणि मुलांसाठी बदल घडवणे" ही थीम असणार आहे. internationalmensday.com च्या माहिती नुसार, या दिवशी पुरुष आणि मुलांना शारीरिक व मानसिक आरोग्याविषयी प्रत्यक्ष मदत व्हावी तसेच आयुष्यात सकारात्मकता पाळणाऱ्या आदर्श पुरुषांचे दर्शन घडावे अशी अपेक्षा आहे. या गुणांचा प्रसार सर्व पुरुषांमध्ये झाल्यास एक उत्तम जगाचे निर्मिती करता येईल असा विश्वास देखील या संस्थेने व्यक्त केला आहे.