Happy International Men's Day 2019 HD Images: जागतिक पुरुष दिनाच्या शुभेच्छा देणारे Greetings, Wallpapers, WhatsApp Status शेअर करून द्या तुमच्या मित्रपरिवाराला खास संदेश

International Men's Day 2019: स्त्रीच्या सन्मानार्थ महिला दिन साजरा करता पण पुरुषांचं काय? असा प्रश्न करणाऱ्यांना उत्तर देणारा आजचा खास दिवस म्हणजेच जागतिक पुरुष दिन! जगभरातील 70 देशांनी 19 नोव्हेंबर हा दिवस पुरुषांचा सन्मान करण्यासाठी राखीव ठेवलेला आहे. मात्र अनेकदा पुरुषांना देखील याबाबत माहिती नसते. यंदा मात्र या खास दिवशी तुमच्या आयुष्यात भाऊ, बाबा, नवरा, मित्र, प्रियकर अशा अनेक भूमिका पार पडणाऱ्या पुरुषांना या दिवसा बद्दल माहिती देऊन तुम्ही स्पेशल फील करून देऊ शकता. यासोबतच काही खास शुभेच्छा देऊन तुम्ही बोनस आनंद पसरवू शकता.. काळजी करू नका या साठी तुम्हाला वेगळी मेहनत करावी लागणार नाही, या काही मराठी Greetings, Wallpapers, WhatsApp Stickers च्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मित्रांना, मुलांना, तुमच्या ओळखीतील पुरुष मंडळींना तसेच सोशल मीडियावरील परिवाराला शुभेच्छा देऊ शकता.

अलीकडे कुठल्याही खास दिवशी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देण्याला विशेष महत्व आहे.. मात्र यासाठी मोठेमोठे मॅसेज शोधताना दमछाक होते हे ही तितकेच खरे आहे. तसेच मोठमोठे मॅसेज पाठ्वण्यापेक्षा थोडक्यात मुद्दा मांडल्यास लोकांना अधिक आवडते. यामुळे वाचणाऱ्याचा वेळ वाचवत तुमच्या सदिच्छा मात्र हव्या तश्या पोहचवता येतात. हीच बाब लक्षात घेऊन आम्ही काही फ्री टू डाउनलोड आणि रेडिमेड शुभेच्छापत्रे तयार केली आहेत. (International Men's Day 2019: जागतिक पुरुष दिन 19 नोव्हेंबर रोजी का साजरा केला जातो? यामागील इतिहास आणि यंदाची थीम सविस्तर जाणून घ्या)

प्रतिवर्षीप्रमाणे यंदा 19 नोव्हेंबर रोजी भारतात सुद्धा या दिवसाचे सेलिब्रेशन होणार असून यंदा "पुरुष आणि मुलांसाठी बदल घडवणे" ही थीम असणार आहे. या दिवशी पुरुष आणि मुलांना शारीरिक व मानसिक आरोग्याविषयी प्रत्यक्ष मदत व्हावी तसेच आयुष्यात सकारात्मकता पाळणाऱ्या आदर्श पुरुषांचे दर्शन घडावे अशी अपेक्षा आहे