उत्तराखंड (Uttarakhand) राज्यात हिवाळ्यातील पर्जन्यमानात 99% घट (Winter Rainfall Deficiency in Uttarakhand) झाल्यामुळे पर्यावरणवादी आणि शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर चिंता निर्माण झाली आहे. डेहराडूनमधील हवामान केंद्राचे संचालक, विक्रम सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 19 दिवसांपासून पाऊस (Winter Rainfall) लांबला आहे. खरे तर या काळात पर्जन्यवृष्टी अपेक्षीत असते. अनेक वर्षे असेच घडत आले आहे. मात्र, यदा प्रथमच हिवाळी पावसाने इतकी ओढ दिली आहे. ही परिस्थीती शेतीसाठी महत्त्वपूर्ण आव्हाने उभी करते. नजिकच्या काही काळामध्ये तर यात कोणताही बदल होण्याची शक्यता फारशी दिसत नाही.
हवामान आणि शेतीवरील परिणाम:
उत्तराखंडमध्ये सध्या हिवाळा सुरु आहे. या प्रदेशात भौगोलिक रचनाच अशी आहे की, ज्यामुळे हिवाळ्यात पर्जन्यवृष्टी होते. यंदा मात्र काहीशी स्थिती विचित्र आहे. सध्या हवामान मोठ्या प्रमाणात कोरडे हवामान आहे. हिवाळ्यातील पावसाची कमतरता अभूतपूर्व रित्या 99% पर्यंत पोहोचली आहे. पुढच्या आठ ते दहा दिवसांध्ये परिस्थिती सुधारेल अशी आशा आहे. मात्र, सध्यास्थितीत पऊस लांबल्याने राज्यभरातील कृषी क्षेत्रावर लक्षणीय परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या मान्सूननंतरच्या महिन्यांपासून कायम राहिलेल्या कोरड्या वातावरणामुळे शेतकरी विशेषतः प्रभावित झाले आहेत. (हेही वाचा, Women Playing Cricket In Hills: दुर्गम डोंगरावर क्रिकेट खेळणाऱ्या तरुणींचा व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांनाही भावला त्यांचा अंदाज (Watch Video))
हवामानविषयक स्थिती:
उत्तराखंड राज्यातील हवामानाच्या स्थितीबातब इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, डेहराडूनमधील हवामान केंद्राचे संचालक, विक्रम सिंग यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, सन 2023 या वर्षांमध्ये नोव्हेंबर (-66%) आणि डिसेंबर (-75%) या दोन्ही महिन्यांत पर्जन्यवृष्टीचे प्रमाण प्रचंड कमी होते. हिच स्थिती जानेवारी महिन्यातही कायम आहे. पर्वतीय भाग, स्वच्छ आकाश आणि भरपूर सूर्यप्रकाशाचा आनंद नागरिकांना मिळत असला तरी, शेतीसाठी मात्र हे वातावर पोषक नसल्याचे विक्रम सिंग सांगतात.
मैदानी भागात धुके:
मैदानी भागात, गेल्या तीन आठवड्यांपासून सतत धुक्यामुळे दिवसाचे तापमान सामान्यपेक्षा 6 ते 7 अंशांनी खाली घसरले आहे. जे थंडीच्या दिवसासारखे आहे. दरम्यान, वायव्येकडील वारे सक्रीय झाल्यामुळे येत्या काही दिवसांत आकाश निरभ्र पाहायला मिळू शकते. त्याचाही संभाव्य वातावरणावर मोठा परिणाम पाहायला मिळतो.
उत्तराखंड हे पर्वयतीय प्रदेश आणि डोंगराळ प्रदेश म्हणून ओळखला जातो. सहाजिकच या राज्यात मोठ्या प्रमाणावर उंचच उंच पर्वतीय टेकड्या पाहायला मिळतात. त्यामुळे या ठिकाणीची शहरे, गावे आणि शेतंही मोठ्या डोंगराळ भागातच वसलेली पाहायला मिळते. या ठिकाणी बर्फाळ प्रदेश मोठ्या प्रमाणार असल्याने येथे हिवाळ्यातच पाऊसही पडत असतो. जो पुढे शेतीसाठी सहाय्यभूत ठरत असतो.