
COVID 19 विरुद्ध भारताच्या लढाईत आघाडीवर असलेले केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन (Dr. Harshvardhan) यांची जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. 22 मे रोजी जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत. डॉ. हर्षवर्धन हे जपानचे डॉ. हिरोकी नकतानी यांची जागा घेणार आहेत. नकतानी हे सध्या डब्ल्यूएचओच्या कार्यकारी मंडळाचे 34 अध्यक्ष आहेत. या पदावर भारताचे प्रतिनिधी नेमण्याच्या प्रस्तावावर मंगळवारी 194 देशांनी संमती दर्शवली आहे. भारतातील कोरोना व्हायरस संदर्भातील सविस्तर अपडेट्स जाणून घ्या एका क्लिक वर
प्राप्त माहितीनुसार, WHO च्या दक्षिण-पूर्व आशिया ग्रुप मधून डॉ. हर्षवर्धन म्हणजेच भारतीय प्रतिनिधींची निवड करण्यात आल्याचा निर्णय मागील वर्षी झाला होता. मे पासून सुरु होणाऱ्या 3 वर्षीय कार्यकाळासाठी भारताचे प्रतिनिधी डॉ. हर्षवर्धन यांची निवड झाली होती. या निर्णयावर केवळ औपचारिक अंमलबजावणी बाकी राहिली होती, मंगळवारी सर्व देशांच्या संमतीने हा निर्णय जाहीर करण्यात आला यानुसार आता डॉ. हर्षवर्धन हे कार्यभार स्वीकारणार आहेत. Coronavirus: भारतात आतापर्यंत 25,12,388 नागरिकांची COVID 19 चाचणी, गेल्या 24 तासात 1,08,121 नमूने तपासले- आयसीएमआर
दरम्यान, या प्रादेशिक गटांमध्ये अध्यक्ष पदाचा कार्यकाळ एक वर्षासाठी असतो. शुक्रवारी सुरू होणार्या पहिल्या वर्षासाठी भारताचे नामनिर्देशित कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष म्हणून डॉ. हर्षवर्धन यांची नियुक्ती झाली आहे. हे कार्यकारी मंडळ हे आरोग्यविषयक क्षेत्रात तांत्रिकदृष्ट्या पात्र असलेल्या 34 जणांचे आहे. यापैकी प्रत्येक जण वर्ल्ड हेल्थ असेंब्लीने निवडलेल्या एखाद्या सदस्याने नियुक्त केलेला आहे. सदस्य राज्ये तीन वर्षांच्या मुदतीसाठी निवडली जातात. कार्यकारी मंडळाची मुख्य कार्ये हेल्थ असेंब्लीच्या निर्णय आणि धोरणांवर काम करणे, त्यास सल्ला देणे अशा स्वरूपात असते.