COVID 19 Teste | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस संकटाचा सामना करण्यासाठी देशातील आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. भारतात गेल्या 24 तासात कोविड 19 विषाणू तपासणीसाठी 1,08,121 नमुने तपासण्यात आले. सुरुवातीपासून आज (20 मे 2020) सकाळी नऊ वाजेपर्यंत संबंध देशात 25,12,388 इतके नमुने कोरोना व्हायरस नियंत्रणात आणण्यासाठी तपासण्यात आल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (Indian Council of Medical Research) म्हणजेच (ICMR) ने दिली आहे.

आयसीएमआरने देशभरात केल्या जाणाऱ्या चाचण्यांचा आकडा दिला आहे. तर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज सकाळीच देशभरातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची आकडेवारी दिली आहे. त्यानुसार, गेल्या 24 तासात देशात 5,611 इतके कोरना व्हायरस संक्रमित रुग्ण आढळले आहेत. तर, तब्बल 140 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या 106750 इतकी झाली आहे. त्यातील 61149 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर 3303 जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरीत रुग्णांची प्रकृती उपचारानंतर सुधारल्याने आणि त्यांना बरे वाटू लागल्याने रुग्णालयातून सुटी (डिस्चार्ज) देण्यात आला आहे. (हेही वाचा, Coronavirus: एक लाखाचा टप्पा पार, भारतील कोरना व्हायरस रुग्णांची संख्या 106750; गेल्या 24 तासात 5,611 नव्या रुग्णांची नोंद, 140 जणांचा मृत्यू)

एएनआय ट्विट

केंद्रीय आरोग्य मंत्रालय, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, केंद्र सरकार आणि देशभरातील विविध राज्यांतील राज्य सरकारं कोरोना व्हायरस संकट नियंत्रणात ठेवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. त्यासाठी विविध प्रयत्न आणि उपाययोजना केली जात आहे. या उपाययोजनांचा एक भाग म्हणजे लॉकडाऊन. गर्दी टाळली जावी आणि कोरोना व्हायरस संक्रमनाची श्रृंखला तुटावी यासाठी लॉकडाऊन घेण्यात आला आहे.

आता तर लॉकडाऊन 4.0 सुरु झाला आहे. या लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथीलता तर बऱ्याच प्रमाणात नियम कडक करण्यात आले आहेत. या सर्वांचा किती आणि कसा परिणाम होतो यावर कोरोना व्हायरस संकटावरचे नियंत्रण ठरु शकते. कोरोना व्हायरस म्हणजेच कोविड 19 या विषाणूवर जगभरात सध्यास्थितीत तर कोणतीच लस, औषध अथवा उपाय उपलब्ध नाही. त्यामुळे जास्तित जास्त चाचण्या करत राहणे आणि कोरोना व्हायरस संक्रमित असलेले परिसर शोधून काढणे हाच एकमेव उपाय आहे.