Coronavirus| | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस (Coronavirus) रुग्णांची भारतातील संख्या तासातासाला वाढते आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health and Family Welfare) दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात देशात 5,611 इतके कोरना व्हायरस संक्रमित रुग्ण आढळले आहेत. तर, तब्बल 140 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या 106750 इतकी झाली आहे. त्यातील 61149 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर 3303 जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरीत रुग्णांची प्रकृती उपचारानंतर सुधारल्याने आणि त्यांना बरे वाटू लागल्याने रुग्णालयातून सुटी (डिस्चार्ज) देण्यात आला आहे.

दरम्यान, भारतासह महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. शेवटची माहिती हाती आली तेव्हा महाराष्ट्रात नव्या 2,100 जणांसह कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या 37,158 इतकी होती. याबाबत माहिती देताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील एकूण 67 प्रयोगशाळांमधून (टेस्टींग लॅब) प्रतिदिन 15000 चाचण्या होत आहेत. त्यामुळे करोना संक्रमित रुग्ण सापडणे सोपे जात आहे. इतकेच नव्हे तरत राज्यातील कोरोना व्हायरस संक्रमितांचा मृत्यूदरही कमी झाला असून तो 3.2% वर आला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. (हेही वाचा, Coronavirus: लॉकडाऊन काळात कामाच्या ठिकाणी COVID 19 प्रसार रोखण्यासाठी MOHFW ने जारी केली मार्गदर्शक तत्वं)

एएनआय ट्विट

कोरोना व्हायरस संकट नियंत्रणात ठेवण्यासाठी देशातील केंद्र सरकार आणि विविध राज्यांतील राज्य सरकारं युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. आरोग्य यंत्रणा जोरदार प्रयत्न करत आहे. मात्र त्यासोबतच गर्दी टाळली जावी आणि कोरोना व्हायरस संक्रमनाची श्रृंखला तुटावी यासाठी लॉकडाऊन घेण्यात आला आहे. आता तर लॉकडाऊन 4.0 सुरु झाला आहे. या लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथीलता तर बऱ्याच प्रमाणात नियम कडक करण्यात आले आहेत. या सर्वांचा किती आणि कसा परिणाम होतो यावर कोरोना व्हायरस संकटावरचे नियंत्रण ठरु शकते.