Lockdown | |Representational Image | (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटामुळे देश लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आला. अपवाद वगळता सर्व व्यवहार ठप्प झाले. लॉकडाऊन यशस्वी करणयासाठी विशेष नियमावली करण्यात आली. त्याचा प्रामख्याने भर हा गर्दी टाळण्यावर होता. परिणामी त्याचा मोठा फटका देशातील उद्योग, व्यवसाय, नोकऱ्या, दुकाने आणि सर्वसामान्य नागरिकांना बसला. मार्च महिन्यात सुरु झालेला लॉकडाऊन आता सुरु असलेल्या मे महिना अखेरपर्यंत कायम राहिल असे सांगण्यात आले आहे. हा लॉकडाऊन यापूर्वी 3 वेळा वाढविण्यात आला. सध्या लॉकडाउन 4.0 सुरु आहेत. दरम्यान, लॉकडाउन 4.0 मध्ये उद्योग, व्यवसाय आणि दुकाने सुरु करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने काहीशी शिथीलता दिली आहे. मात्र, हे उद्योग सुरु करताना केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (Ministry of Health and Family Welfare) काही मार्गदर्शक तत्वं घालून दिली आहेत. ज्याचा कामाच्या ठिकाणी अवलंब करायचा आहे. काय आहेत ही तत्वं? घ्या जाणून..

मूलभूत प्रतिबंधात्मक उपाय (Basic preventive measures

  • कामाच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींग राखणे अनिवार्य आहे. त्याचे पालन नेहमीच केले पाहिजे. दोन व्यक्तिंमध्ये किमान एक मीटर अंतर ठेवले पाहिजे.
  • चेहऱ्याला मास्क असणे बंधनकारक.
  • साबण आणि पाणी याचा वापर करुन हात वारंवार स्वच्छ करणे.
  • अल्कोहोल-आधारित हँड सॅनिटायझर्स कमीतकमी 20 सेकंद वापरावे.
  • शिंक, खोकला आदी वेळेस आपले तोंड स्वत:च्या हाताच्या कोपराचा सांधा आणि दंड यांच्या लपवा. अथवा तोंडाला रुमाल लावा. त्यानंतर हात आणि शिंकलेला भाग, तुषार उडालेला भाग स्वच्छ करा.
  • प्रत्येक व्यक्तिने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. थकवा, सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.

कामाचे ठिकाण बंद (Closure of workplace)

कार्यालय अथवा कोणत्याही ठिकाणी काम करत असताना कोविड 19 विषाणू असलेले एक अथवा दोन कर्मचारी, व्यक्ती सापडल्यास त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करा. प्रशासनाला माहिती द्या. संबंधित ठिकाण 48 तासांत निर्जंतुकीकरण केले जाईल. निर्जंतुकीकरणानंतर इमारत 48 तासांसाठी सील केली जाईल. निर्जंतुकीकरणानंतर पुन्हा काम सुरू केले जाईल. जोपर्यंत इमारत अथवा कामाचे ठिकाण कर्मचाऱ्यांसाठी योग्य होत नाही तोपर्यंत कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची अनुमती द्या. (हेही वाचा, Lockdown: लॉकडाऊन काळात घरी जाण्यासाठी गृहमंत्रालयाची नियमावली; पाहा कसा करायचा अर्ज?)

दरम्यान, कोरोना व्हायरस संकटाममुळे देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे विविध राज्यांतील अनेक कामगार मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करत आहेत. यात महाराष्ट्रातून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांमध्ये जाणाऱ्या कामगारांची संख्या मोठी आहे. अशा स्थितीत आहेत त्या मजुरांसोबत काम करणे उद्योजकांसमोरील मोठे आव्हान असणार आहे.