कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटामुळे अवघा देश लॉकडाऊन (Lockdown) आहे. देशभरातील विविध नागरिक विविध राज्यांमध्ये अडकले आहेत. प्रत्येकालाच आपल्या गावी जाण्याची ओढ आहे. तुम्ही लॉकडाऊनमध्ये अडकला असाल आणि तुम्हाला घरी अथवा तुमच्या मूळ गावी जायचे असेल तर आता ते शक्य आहे. त्यासाठी गृहमंत्रालयाने लॉकडाऊन नियमं शिथील केले असून, नागरिकांना नियमांचे पालन करत घरी जाण्यास सशर्थ परवानगी दिली आहे. त्यासाठी गृहमंत्रालयाने विशिष्ट नियमावली आणि अर्ज नमूना तयार करुन दिला आहे. 'तो' विशिष्ट अर्ज भरुन देत नियम पाळण्याचा विश्वास दिल्यास तुम्ही आपल्या गावी जाऊ शकता. गृहमंत्री (Home Minister) अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी याबाबत माहिती दिली आहे.
गावी जाण्यासाठी कोण करु शकतं अर्ज?
- विद्यार्थी
- कामगार
- नागरिक
- इतर
गृहमंत्री अनिल देशमुख काय म्हणाले?
लॉकडाऊन मुळे वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्यांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने परवानगी दिली आहे. राज्यात किंवा परराज्यात विविध ठिकाणी अडकलेल्या विद्यार्थी, कामगार आणि इतरांना आपआपल्या गावी जाण्यासाठी आपली संपूर्ण माहिती असणारा अर्ज नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेल्या संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करावा लागेल, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Lockdown: 17 मे पर्यंतच्या लॉकडाऊन काळात काय सुरू राहणार? काय बंद राहणार? जाणून घ्या)
जिल्हाधिकाऱ्यांना द्यायच्या अर्जात काय भराल?
- पूर्ण नाव
- मोबाईल क्रमांक
- पर्यायी मोबाईल क्रमांक
- जेथील रहिवासी आहात त्या तालुक्याचं नाव
- ज्या राज्यात अडकला आहात त्या राज्याचं नाव
- ज्या जिल्ह्यात अडकला त्या जिल्ह्याचं नाव
- ज्या तालुक्यात अडकला त्या तालुक्याचं नाव
- जिथे अडकला तेथील पिन कोड
- संपूर्ण पत्ता
- आपण एकटे आहात का?
- आपण कुटुंबासोबत आहात का?
- आपण गटामध्ये आहात का?
- तुमच्याकडे स्वतःचे वाहन आहे का?
गृहमंत्री अनिल देशमुख ट्विट
लॉकडाऊन मुळे वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्यांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने परवानगी दिली आहे. त्यासाठीची महत्त्वपूर्ण माहिती. pic.twitter.com/szNxgf2z7s
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) May 1, 2020
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांना अर्ज भरुन दिला की, लगेच तुमचा गावी जाण्याचा मार्ग मोकळा होणार नाही. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पातळीवर निर्णय घेण्यात येणार आहे. त्यासाठी एका अॅपचीही निर्मिती करण्यात आली आहे. खूप गर्दीच्या ठिकाणी सरकारी व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला जाईल. ज्या ठिकाणी लोकांची संख्या कमी आहे. किंवा 5 ते 10 जणांचा छोटा समूह आहे अशा लोकांनी प्रवास करत असलेल्या ठिकाणावरुन कोरोना व्हायरस चाचणी करुनच आपल्या इच्छित ठिकाणासाठी निघायचे आहे. नागरिकांनी प्रवासाला निघण्यापूर्वी तपासणी करणं आणि इच्छित ठिकाणी पोहोचल्यावर 14 दिवस सेल्फ क्वारंटाईन राहणे बंधनकारक आहे, असंही राजेश टोपे यांनी म्हटले आहे. दरम्यान, या काळात सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे, असेही राजेश टोपे यांनी म्हटले आहे.