Lockdown in India | File Image | (Photo Credits: PTI)

संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसने (Coronavirus) विळखा घातला आहे. अशातच भारतात कोरोना रुग्णांची संख्या 35 हजारांपेक्षा जास्त झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात 3 मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. परंतु, या लॉकडाऊनचा कालावधी संपण्यास केवळ 2 दिवसांचा अवधी असताना केंद्र सरकारने पुन्हा एकदा 2 आठवड्यांनी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या 17 मे पर्यंत राज्यात तसेच देशात लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे.

या लॉकडाऊन काळात राज्य सरकारने काही गोष्टींमध्ये सुट दिली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबत पत्रक काढून यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यानुसार, राज्यात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन संदर्भात वेगवेगळे नियम करण्यात आले आहेत. यात रेड झोनसाठी अतिशय कमी तर ग्रीन झोनसाठी सर्वाधिक सुट देण्यात आली आहे. (हेही वाचा - महाराष्ट्रात आतापर्यंत 227 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण ; 1 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE)

'या' सेवा राहणार बंद -

रेल्वे सेवा, हवाई वाहतूक, मेट्रो आणि सार्वजनिक वाहतूक 17 मेपर्यंत बंद राहणार आहेत.

सर्व शैक्षणिक संस्था, शाळा, कॉलेजेस 17 मेपर्यंत बंद राहणार

मॉल, सिनेमा हॉल, स्पोर्ट्स क्लब बंद राहणार

ग्रीन झोनमध्ये 'या' गोष्टी सुरु राहणार?

ग्रीन झोन जिल्ह्यामध्ये 50 टक्के क्षमतेनेची प्रवासी वाहतूक सुरू राहणार आहे.

ग्रीन झोनमधील दारूची दुकानं आणि पान शॉप्स सुरू ठेवण्याचा विचारही सरकार करत आहे. परंतु, दुकानदाराने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे आहे.

17 मे पर्यंतच्या लॉकडाऊन काळात बस डेपोमध्ये 50 टक्केच कर्मचारी काम करणार आहेत.

दरम्यान, आज वाढवण्यात आलेल्या लॉकडाऊन संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी 10 वाजता देशवासियांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे यात ते कोणत्या घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने कायद्यात दुरुस्ती करून 17 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. दरम्यान, देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन केंद्र सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.